नाशिक

सिडको प्रभाग बैठकीत पाणीप्रश्नावरून गोंधळ

सुधाकर बडगुजर-मुकेश शहाणे वाद उफाळला

सिडको : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच सोमवारी (दि. 29) सिडको प्रभाग समितीची बैठक नवीन नाशिक विभागीय कार्यालयात पार पडली. नागरिकांच्या पाणी, रस्ते आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा असताना, दूषित पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून बैठकीतच दोन नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. वाद इतका वाढला की, सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले आणि कामकाजावरही त्याचा परिणाम झाला.
बैठकीच्या प्रारंभी प्रभाग क्रमांक 25 च्या नगरसेविका साधना मटाले यांनी दूषित पाण्याची बाटली सभापतींसमोर ठेवत परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर या विषयावर चर्चा सुरू असताना नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सभेच्या कार्यपद्धतीबाबत भूमिका मांडली. त्याचवेळी ज्येष्ठ भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी हस्तक्षेप करून नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
काही वेळातच हा वाद तीव्र झाला. दोन्ही नगरसेवकांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करत शाब्दिक संघर्ष अधिकच चिघळविला. महिला नगरसेविका, ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाच दोघांनी एकमेकांवर अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिल्याने सभागृहातील वातावरण गढूळ झाले. या प्रकारामुळे काही काळ बैठकीचे कामकाजही विस्कळीत झाले. यानंतर नगरसेविका साधना मटाले यांनी दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक मुरलीधर भामरे यांच्यासह अन्य सदस्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर बैठक पुन्हा सुरू करण्यात
आली. सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यातील राजकीय मतभेद यापूर्वीही विविध निवडणुकांच्या काळात चर्चेत राहिले आहेत. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांदरम्यान दोघांमधील संघर्ष अनेकदा समोर आला होता. आता प्रभाग समितीच्या पहिल्याच बैठकीतही तो पुन्हा उघड झाल्याने आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Confusion over water issue in CIDCO ward meeting

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago