वधू-वरांच्या हारांसह वाहन सजावटीसाठी वापर; फुलांच्या दरात 20 टक्के वाढ
निफाड : विशेष प्रतिनिधी
सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू असून, विवाह सोहळ्यांमुळे फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. लग्न समारंभातील सजावट, वधू-वरांचे हार, वाहनांची सजावट, महिलांच्या केशरचनेसाठी गजरे तसेच पाहुण्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर फुलांचा वापर होत असल्याने बाजारात फुलांच्या किमतींनीही उसळी घेतली आहे.
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने फुलांचे दर सुमारे 20 टक्क्यांनी वाढले असून, लग्नसराईत आता
फुलांचाही सुगंध महागल्याचे चित्र निफाड शहरासह तालुक्यात दिसून येत आहे. आधीच सोने-चांदी, कपडे, भोजन व्यवस्था, मंडप, बँड, छायाचित्रण आदी विविध खर्चांमुळे विवाह सोहळ्यांचे बजेट वाढले आहे. त्यात आता फुलांच्या वाढलेल्या दराचीही भर पडल्याने वधू-वर पक्षाच्या खर्चात आणखी वाढ झाली आहे. कृत्रिम फुलांच्या वापरावर निर्बंध आल्याने अनेकजण नैसर्गिक
फुलांनाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे फुलांच्या मागणीत आणखी वाढ झाली आहे.
लग्न समारंभात फुलांचे विशेष महत्त्व असते. विवाह मंडपाची सजावट, स्टेज डेकोरेशन, वधू-वरांचे हार, वाहन सजावट, महिलांसाठी गजरे तसेच पाहुण्यांच्या स्वागतासाठी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परिणामी, फुलांच्या बाजारात सध्या मोठी उलाढाल होत असून
फूल विक्रेतेही मागणीनुसार हार, बुके आणि सजावटीची कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.
व्यापार्यांच्या माहितीनुसार, कडक उन्हामुळे फुलांचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत आहे. राज्यातील तसेच शेजारील राज्यांतून फुलांची आवक होत असली तरी ती वाढत्या मागणीसमोर अपुरी ठरत आहे. परिणामी ग्राहकांना वाढीव दराने
फुले खरेदी करावी लागत आहेत.
सध्या वधू-वरांच्या हारांची किंमत किमान 500 रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर वाहन सजावटीसाठी एक हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. लग्नसराईच्या हंगामात पुढील काही दिवस
फुलांची मागणी कायम राहण्याची शक्यता असल्याने दरही उच्चांकी पातळीवर राहण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
फुलांचे दर
शेवंती – दोनशे पन्नास रुपये किलो
पिवळा झेंडू – आठशे रुपये जाळी
लाल झेंडू – सातशे रुपये जाळी
गुलाब – शंभर रुपये डझन
लिली – एक हजार नग सहाशे रुपये
मोगरा – सहाशे पन्नास रुपये किलो
उन्हाळ्यातील प्रचंड ऊन, पाणीटंचाई यामुळे फूल बाजारात फूल व्यवसायाला फटका बसला आहे.
बाजारात फुलांची आवक कमी आहे. फुलांच्या भावात तेजी आली आहे. नाशिक येथून विविध फुले आणावी लागतात. त्यामुळे
व्यावसायिक व ग्राहकांना तोटा सहन करावा लागत आहे.
– बंडू शिंदे,
फूल व्यावसायिक, निफाड
Fragrance of various flowers comes at a premium during the wedding season!
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…