नाशिक

त्र्यंबकेश्वरमध्ये अटॅच्ड रूम्सच्या बांधकामाला वेग

सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर लॉजिंगद्वारे कायमस्वरूपी उत्पन्नाचा खटाटोप

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर शहराच्या हद्दीत काही हजार सेल्फ अटॅच्ड रूमचे बांधकाम सुरू आहे. घाऊक प्रमाण रूमबांधणीमध्ये साधू आखाडेदेखील आघाडीवर असल्याचे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात शासनाने निवासी खोल्या बांधून देण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
शासनाने पहिल्या टप्प्यात प्रत्येक आखाड्याला एक कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात पुन्हा एक कोटी रुपये मंजूर करत प्रत्येकी 12 निवासी खोल्या बांधून देण्यासाठी निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर 13 मे 2026 रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी तीन कोटी रुपये प्रत्येक आखाड्यासाठी मंजूर केले. सिंहस्थ कुंभमेळ्यांंतर्गत प्रत्येक आखाड्याला पाच कोटी रुपये विकासकामांसाठी देण्यात येत आहेत. तिसर्‍या टप्प्यातील तीन कोटींबाबत आखाड्यांच्या साधू-महंतांचा विचार घेतला असता, बहुतेक आखाड्यांनी अटॅच्ड रूम बांधून देण्याचे सांगितले आहे. पहिल्या टप्प्यातील ध्वजस्तंभ, टॉयलेट ब्लॉक यांची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्र्यंबकेश्वर शहरात प्लॉट विकत घेऊन त्यावर निवासी खोल्या म्हणजेच लॉजिंग बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. गावाकडची जमीनजुमला विकून अथवा कर्ज काढून प्लॉट घेऊन त्यावर निवासी खोल्यांची इमारत बांधणीला वेग आला आहे. जमेल तसे 5 ते 25 खोल्यांच्या इमारती उभ्या राहत आहेत. लॉजिंग व्यवसायासाठी बांधकाम करताना त्यासाठी लागणारी जमीन वाणिज्य वापराची आहे की नाही? भूखंड बांधकाम परवानगी मिळवण्यास पात्र आहे की नाही? याची कोणतीही शहानिशा करण्यात येत नाही. विनापरवाना बांधकामांनी भविष्यात नागरी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधीसाठी येणार्‍या निवासी भाविकांची संख्या मोठी आहे. अनेकदा त्यांना राहण्यास रूम मिळत नाहीत. त्यासाठी रूम बांधण्यावर भर देण्यात येत आहे. लॉजिंग बांधून ती चालवायला देण्याकडे कल असल्याचे दिसते.
त्र्यंबकेश्वर येथे लॉजिंग चालवायला घेणे, भाविकांना गाठून कमिशनवर रूम भरणे असे व्यवसाय जोरात सुरू आहेत. सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत वापर झाल्यानंतर लॉजिंग म्हणून चालवायला देऊन कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे.

Construction of attached rooms accelerates in Trimbakeshwar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago