कन्सल्टंट,तथाकथित पत्रकार रवींद्र एरंडेला इतक्या दिवसांची कोठडी

सातपूर: प्रतिनिधी

मुलाला चांगली नोकरी लावून देतो, भविष्य उज्ज्वल करून देतो असे आमिष दाखवत महिलेवर इगतपुरी आणि नाशिक येथे लैंगिक अत्याचार करणाऱ्या व टॅब मध्ये 121 व्हीडिओ सापडलेल्या तथाकथित पत्रकार तथा कन्सल्टंट रवींद्र एरंडे याला शुक्रवारी रात्री अटक केली होती. आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली. ऑफिस बॉय ने हार्ड डिस्क चोरून त्यातील व्हीडिओ च्या माध्यमातून एरंडे याला ब्लॅकमेल केले जात होते.याप्रकरणी एरंडे याने सातपूर पोलिसात धाव घेऊन ऑफीस बॉय आकाश बकरे आणि त्याच्या तीन साथीदारविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शिताफीने ऑफिसबॉय आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले होते. मात्र या व्हिडीओ मध्ये एरंडे याचेच अश्लील व्हीडिओ सापडले होते. पोलिसांनी केलेल्या आवाहननंतर एका महिलेने एरंडे विरुद्ध बलात्कार केल्याची फिर्याद दाखल केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी एरंडे यास ताब्यात घेतले होते. अटक केल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर केले होते. यावेळी पोलिसांनी7 दिवस कोठडी मिळावी अशी मागणी कोर्टात केली. मात्र न्यायालयाने 2 दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

 

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

8 hours ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

8 hours ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

8 hours ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

8 hours ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

8 hours ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

8 hours ago