संपादकीय

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

– डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार

भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे सुंदर आणि सर्वोच्च प्रतिक म्हणजे नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा. नाशिक जिल्हा त्यातही नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर व हे दोन ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. नाशिक भूमी रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे, तर त्र्यंबकेश्वर मध्ये गोदावरी नदीचा उगम होतो व ती नदी नाशिक जिल्ह्यातून पुढे दक्षिणेकडे जावून समुद्राला मिळते म्हणून नाशिक हे पौराणिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे.
नाशिकने आतापर्यंत अनेक सिंहस्थ कुंभ पाहून त्यांचा अनुभव आनंद घेतला आहे. शहर छोटे होते ते विकसित होवून 20 लाखापेक्षा अधिक लोक वस्ती आज झालेली असून सिंहस्थ कुंभमेळा करिता सन 2026 – 27 मध्ये कोट्यावधी भाविक देशातून व प्रदेशातून येणार आहेत अशी संभावना आहे.
नाशिक तसे भाग्यवान शहर आहे. त्यात गोदावरी नदी, रामभूमी, साहित्यिक व संगीत तज्ञ यामुळे सामाजिक लढे या शहरातून झालेले आहेत. सिंहस्थ कुंभमेळा दर बारा वर्षांनी होत असतो त्यासाठी नियमित आर्थिक शासन जे साहाय्य करते त्या व्यतिरिक्त संस्था कुंभमेळासाठी विकास करण्याच्या दृष्टीने करोडो रुपयांचे स्वतंत्र आर्थिक मदत करत असते. नाशिकचा विकास होण्याच्या दृष्टीने इतर जिल्ह्यांपेक्षा ह्या सुवर्णसंधीचा विनयोग करून नाशिक स्वच्छ, सुंदर व हरित आणि पर्यटनाला चालना देणारे स्मार्ट सिटी नवनिर्मिती करता येते त्या दृष्टीने नाशिक शहराचे ऐतिहासिक महत्त्व वाढणार आहे. त्या दृष्टीने घोडदौड सुरु आहे.
सिंहस्थ कुंभमेळा हा एक उत्सव आहे. तो यशस्वी करण्याच्या दृष्टीने केवळ शासनाची जबाबदारी आहे असे म्हणून चालणार नाही तर भाविक हे आपले नातेवाईक आहेत. त्यांचे गैरसोय होऊ नये, विकास आपल्या शहराचा, जिल्ह्याचा होणार आहे तो आपला स्वार्थ आहे ते साध्य करण्यासाठी समाजाचा समर्पित सहभाग महत्त्वाचा आहे. केवळ प्रशासनावर अवलंबून चालणार नाही, त्याला स्थानिक स्वयंसेवी संस्था (एन. जी. ओ.), सामाजिक संघटना, युवक मंडळ, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्या सक्रिय सहभागावरच ह्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे यश अवलंबून आहे. नाशिकची बदनामी होणार नाही ह्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग देऊन समर्पित व्हावे. भाविकांमध्ये दिव्यांग, दृष्टिहीन, बहुविकलांग, ज्येष्ठ नागरिक, विशेष गरजा असलेल्यांचा सहभाग असेल तसेच परदेशी पाहुणे, इतर राज्येतून येणारे भाविक यांचा सहभाग मोठा असेल. त्या दृष्टीने आपला सिंहस्थ, आपलं गाव, आपले पाहुणे म्हणून सुलभ व सर्वसमावेशक सिंहस्थ प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका घ्यावयाची जबाबदारी आपली असणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा उत्सव दर बारा वर्षांनी येत असतो. तेव्हा स्वयंसेवी संस्थांना दैनंदिन कामाबरोबरच अतिरिक्त काम करण्याची संधी उपलब्ध झाली. त्या दृष्टीने खालील वर्गीकरणाच्या प्रमाणे स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होऊ शकतो.
सिंहस्थ पूर्वनियोजन
प्रशासना बरोबर चर्चा करून सिंहस्थ मेळाव्यासाठी स्वयं इच्छेने प्रामाणिक काम करणार्‍या इच्छुक स्वयंसेवकांचे नियुक्ती करून त्यांना कामाचे वाटप करणे.
त्या स्वयंसेवकांना करोडो लोकांचे व्यवस्थापनात काय अडचणी उद्भवू शकतात त्याचा थोडा अंदाज घेवून त्या कशा निपटारा करता येईल त्या दृष्टीने प्रशिक्षण देऊ शकतात. स्वयंसेवी संस्था ह्या स्वयं आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत त्यासाठी सामाजिक दायित्व फंड (सी. एस. आर.) कुठे प्राप्त होईल ते संकलन करून सुविधा उपलब्ध करू शकतात.
खाणे, पाणी, प्रवास ह्यामुळे किरकोळ आजार, आकस्मितपणे येणारे आजार, हार्ट अटॅक, हाय बीपी, अपघात इमर्जन्सी घडू शकते. त्यासाठी आय. एम. ए. नामवंत डॉक्टर्सची फळी उभारणे, मोठमोठ्या दवाखान्यात काही जागा राखीव ठेवता येतील का असा प्रयत्न करणे. सिंहस्थ मेळा क्षेत्र परिसरात एक ठिकाणी वैद्यकीय सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करून सहयोग देता येईल.
स्वच्छता अभियान
करोडो भाविक येणार म्हणजे तिथे दुकाने, वावर यामुळे अस्वच्छता होतेच. त्या ठिकाणी स्वयंसेवक साधारणता घाटावर तसेच प्लास्टिक मुक्त अभियानात कचरा वर्गीकरण, त्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर करा अशी जनजागृतीची रॅली करून जनजागृती करता येते.
रामकुंड असेल, कुशावर्त असेल तिथे प्रदूषण होऊ नये म्हणून ती रोखण्यासाठी स्वयंसेवक, होमगार्ड, पोलीस, म. न. पा. कर्मचारी यांची साखळी करून विनंती भाविकांना करून प्रतिबंध करून गोदावरी नदीचे प्रदूषण रोखता येईल.
यात्रा म्हणा की मेळावा म्हणा जिथे प्रचंड गर्दी असते तिथे महिला व बालक ही हमखास हरवतात किंवा त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. महिला व बालकल्याण विभागाच्या मदतीने स्वतंत्र महिला स्वयंसेवकांची फळी निर्माण करणे. त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, बालसंगोपन कक्ष त्यात झोका व स्तनपानाची व्यवस्था आणि आपत्कालीन सहाय्य करून योगदान देता येते. सिंहस्थ मेळाव्यात बरेचदा काही लोक आपल्या वृद्ध आई, वडील मुलांना वार्‍यावर सोडून कुटुंब प्रमुख निघून जातो. त्यात काहींना भाषा येत नाही, काही निरक्षर असतात. अशा हरवलेल्या महिला व बालकांसाठी त्यांच्या निवार्‍याची स्वतंत्र व्यवस्था करून भोजन व्यवस्था करणे. पालक आले नाही तर त्यांना बाल निरीक्षणगृह, महिला आश्रम येथे सोय करता येते. जेष्ठ नागरिकांना भाविकांची तीर्थक्षेत्राच्या प्रवेशापूर्वी जे लांबवर चालू शकणार नाहीत त्यांना व्हीलचेअर, स्वच्छ पिण्याचे पाणी, विश्रांती केंद्रावर घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करावी. हा सिंहस्थ मेळावा एक वर्ष जवळपास चालतो. त्या काळात सामाजिक जनजागृती करून व्यसनमुक्ती, जलसंवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान, नेत्रदान, संविधान जागृती, महिला सक्षमीकरण करण्यासाठी असणारे योजनांची माहिती प्रसारण करण्यासाठी जागरूकता करू शकतात. काहींना स्थानिक भाषा येत नाही त्यांना संवाद साधण्यासाठी दुभाषिक विविध भाषेचे ज्ञान असलेल्या दुभाषिकांना संवादक म्हणून काम करता येईल हे सुद्धा एन. जी. ओ.चे आहे. सिंहस्थ काळात स्थानिकांना रोजगार व व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते. त्याकरिता प्रशासनाबरोबर चर्चा करून स्वयंरोजगार स्टॉल, महिला बचत गटाचे स्टॉल, दिव्यांगांनी केलेली उत्पादने विक्रीचे स्टॉल, हस्तकला प्रदर्शन, कौशल्य प्रशिक्षण आदी कामे करून स्वयंसेवी संस्था सहभागी होऊ शकतात. सामाजिक सहभाग म्हणून सी. एस. आर. देणार्‍या कंपन्या, बँका, उद्योग समूह यांचे माध्यमातून विश्रांती केंद्र, पाण्याची व्यवस्था ,वैद्यकीय कक्षाची उभारणी, दिव्यांगांना मार्गदर्शन, आवश्यक ते उपकरण पुरवणे, मोबाईल हेल्प युनिट आदी बरोबरच आकस्मित सेवा म्हणून अग्निशामक यंत्रणा, सुरक्षेतेच्या दृष्टीने पोलीस स्वयंसेवक व्यवस्था करणे. निवास व्यवस्था ही महत्त्वाची आहे. जे श्रीमंत भाविक आहेत त्यांना हॉटेल्स आहेत. जे मध्यम व गरीब पर्यटक भाविक आहे त्यांना निवासासाठी पूर्वी शहरात खूप धर्मशाळा होत्या, पण आता कमी झाल्या आहेत. काहींची व्यवस्था संत, साधू, महंतांच्या आखाड्यात होते किंवा त्यांच्या कुटिरात होते. तेव्हा शैक्षणिक संस्थांकडे काही वस्तीगृह असतील, देवस्थानाकडे काही निवास व्यवस्था असेल, जे मध्यम हॉटेल्स मध्ये निवास व्यवस्था असेल किंवा बिल्डरने काही निवास प्रकल्प उभारत असेल तेथेही सिंहस्थ कुंभ क्षेत्राजवळ तिथे काही व्यवस्था करता आली तर करावी. रिकाम्या जागा स्वच्छ करून तिथे सर्व सोयी उपलब्ध करून निवारा केंद्र म. न. पा. व स्वयंसेवी संस्था, शासन यांच्या मदतीने करावी. सिंहस्थ कुंभमेळा 2026 – 27 हा धार्मिक सोहळा असला तरी ह्या सोहळ्यात मानवता, सेवा, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा महोत्सव आहे. ह्या मेळाव्यासाठी करोडो रुपये शासन खर्ची करणार आहे. त्यामुळे शहराला नवे स्वरूप प्राप्त होईल, कार्यपालट होईल. रस्ते, पाणी, ड्रेनेज, बस स्थानके सुशोभीकरणामुळे अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक हा सुवर्ण त्रिकोण भावी काळात उद्योग वाढीस चालना मिळेल व जिल्हा आर्थिक सक्षम होईल, शिक्षण हब, वैद्यकीय हब त्याचप्रमाणे सामाजिक व सांस्कृतिक हब, औद्योगिक विकास साधला जाईल. दर बारा वर्षांनी येणार सिंहस्थ मेळावा हे नाशिकचे उज्वल विकसित भविष्य घडविणारे आहे. त्यात एन.जी.ओ.चे समर्पण लाख मोलाचे ठरेल यात संदेह नाही.

Contribution of Voluntary Organizations During Simhastha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

14 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

14 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

14 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

14 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

15 hours ago

खाणपट्टेधारक-ठेकेदारांची आज बैठक

उपलब्धतेचा तातडीने आढावा नाशिक : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांना वेग…

15 hours ago