नाशिक

चौथे विश्व मराठी संमेलनाच्या यशस्वितेसाठी समन्वय ठेवावा

मंत्री उदय सामंत : विश्व मराठी संमेलनाच्या तयारीचा घेतला आढावा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक येथे गोदावरीच्या तीरावर 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत चौथे विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनाच्या यशस्वितेसाठी सर्व प्रशासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवत परिपूर्ण नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

नाशिक येथे होणार्‍या विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी काल दुपारी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक अनिल गावित, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री सामंत यांनी सांगितले की, विश्व मराठी संमेलनाच्या पूर्वसंध्येला मराठी भाषा पुरस्कार वितरण सोहळा होईल. विश्व मराठी संमेलनात पुस्तकांच्या स्टॉलसह विविध विभागांचे स्टॉल राहतील, याची दक्षता घ्यावी. त्यात नाशिकची ओळख सांगणार्‍या स्टॉलचा समावेश असावा. तसेच स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तूंच्या स्टॉलचा समावेश करावा. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पाणीपुरवठा आदी सुविधांची उपलब्धता राहील, असेही नियोजन करावे. कुसुमाग्रज उद्यानाची नियमितपणे स्वच्छता करावी. पुढील वेळी कुसुमाग्रज उद्यानास भेट देण्यात येईल. यावेळी मंत्री सामंत यांनी मराठी भाषा पुरस्कार, साहित्यिकांची निवास व्यवस्था, मराठी भाषा विभागाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी नियोजन करण्यात येत आहे. संमेलनाच्या तयारीचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. संमेलनाच्या यशस्वितेसाठी परिपूर्ण नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Coordination should be maintained for the success of the Fourth World Marathi Conference

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जुन्या वादातून युवकाचा कोयत्याने खून…या भागात घडली घटना

सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…

12 hours ago

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

1 day ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

1 day ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

1 day ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

1 day ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

1 day ago