नाशिक

बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

♦ तळेगाव शिवारात पोलिसांचा छापा
♦ पाच संशयितांना अटक
♦ आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
♦ लाखोंचा मुद्देमाल जप्त

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव शिवारात रसायनांचा (केमिकल) वापर करून बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 12 ऑगस्ट 2026 रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक शहर पोलीस, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक टीमने तळेगाव फाट्याजवळील हिरामण दाते यांच्या बंगल्यावर संयुक्त छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले.त्यात अमरेश्वर सुधाकर आईथा (वय 37, रा. प्रेमनगर, हैदराबाद, तेलंगणा), दासहरी प्रसाद सत्यई (वय 36, रा. येल्लारेडी, जि. सिरसिल्ला, तेलंगणा), गोकुळ आनंदराव दाते (वय 56, रा. सिद्धी पार्क, गंगापूर रोड, नाशिक), हिरामण पुंजा दाते (वय 56, रा. तळेगाव, जि. नाशिक), मच्छिंद्र भगवान घनदाट (वय 48, रा. सातपूर, नाशिक) यांचा
समावेश होता
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 9 लाख 75 हजार रुपये (500 रुपयांच्या 1950 खर्‍या नोटा), कोर्‍या कागदांच्या नोटांच्या आकाराचे बंडल, रासायनिक द्रव (केमिकल), आयोडीन व नोटा छापण्याचे साहित्य. मोबाइल फोन व एक चारचाकी वाहन, असा एकूण 12 लाख 19 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता
विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार या आंतरराज्यीय टोळीच्या मुळाशी जाण्यासाठी पुढील तपास करीत आहेत.
रसायन वापरून कशी करायचे बनवाबनवी?
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणि पंचांसमक्ष संशयितांनी फसवणुकीची अनोखी पद्धत कबूल केली.
छापण्याची पद्धत : 500 रुपयांच्या खर्‍या नोटेला विशेष रसायन लावून ती नोट कोर्‍या कागदावर ठेवून लाटण्याने लाटली जात असे. त्यामुळे त्या कागदावर नोटेची फिक्कट प्रतिमा उमटत असे. त्यानंतर ही नोट आयोडीनच्या द्रावणात बुडवून सुकवली जात होती.
फसवणुकीचा फंडा : घटनास्थळावर 500 रुपयांची खरी नोट आणि त्याखाली नोटेच्या आकाराचे काळे कागद ठेवून 30 लाख रुपये असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता.
10 लाखांत 30 लाख : 10 लाख रुपयांच्या खर्‍या नोटांच्या बदल्यात हे 30 लाख रुपयांचे बनावट बंडल देण्याचा कट होता. फसवणूक उघडकीस येऊ नये म्हणून “काही दिवस हा बॉक्स उघडू नका, अन्यथा शाई उडून जाईल“ अशी बतावणी ग्राहकांकडे केली जात होती.

Counterfeit currency factory busted

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

22 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

22 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

22 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

22 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

22 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

23 hours ago