घरातील हुकाला पती-पत्नीने घेतला गळफास
सिन्नर ः प्रतिनिधी
शहरातील एस. टी. कॉलनी परिसरात राहणार्या पती-पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.23) रात्रीच्यावेळी घडली. रोहिदास रामा शिंपी (55) व शोभा रोहिदास शिंपी (55) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. शिंपी दांम्पत्याने आपल्या राहत्या घरामध्ये भिंतीच्या हुकास दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी रामलाल सरवण सैनी (30) रा. उद्योग भवन यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. दोघांवर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन रात्री उशिरा मृतदेह नातेवाईंच्या ताब्यात देण्यात आला. आर्थिक विंवचनेतून दोघांनी आत्महत्या केल्याचे कारण समोर येत असून त्यांच्या आत्महत्येने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…
श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…