नीट पेपरफुटीवरून कोर्टाने ‘एनटीए’ला फटकारले

नवी दिल्ली : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ला नीट-यूजी 2026 च्या पेपरफुटी प्रकरणावरून चांगलेच फटकारले आहे. पूर्वीच्या चुकांमधून एजन्सीने कोणताही धडा घेतला नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असून, देखरेख समितीच्या दाव्यांनंतरही यंत्रणा कशी अपयशी ठरली, असा सवाल उपस्थित केला आहे. वारंवार होणार्‍या पेपरफुटीच्या घटना रोखण्यात एनटीए अपयशी ठरल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. एनटीए आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्याकडून याप्रकरणी प्रतिज्ञापत्र आणि उत्तरे मागितली आहेत. तसेच, 2024 च्या पेपरफुटीनंतर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांनाही समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील हा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या गैरप्रकारांमुळे रद्द केलेली नीट 2026 ची फेरपरीक्षा आता 21 जून रोजी होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Court reprimands NTA over NEET paper leak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *