नाशिक

गुन्हे शाखेकडून घरफोडीतील सराईत जेरबंद

उपनगर पोलिस ठाण्यातील 2022 च्या घरफोडी प्रकरणातील प्रमुख आरोपी

सिडको : विशेष प्रतिनिधी
उपनगर पोलिस ठाण्यात 2022 मध्ये दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील तब्बल चार वर्षांपासून फरार असलेला सराईत आरोपी दानिश निसार खान (वय 31, रा. रजा क्लासिक अपार्टमेंट, काझीनगर, नागजी-वडाळा रोड, नाशिक) याला गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपी मिळून येत नसल्याने त्याच्याविरुद्ध न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 299 अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
शहरातील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2चे पथक फरार आरोपींचा शोध घेत होते.
यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे आणि पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गोपनीय माहितीदारामार्फत दानिश खान हा आयशा मशिदीजवळील रजा क्लासिक अपार्टमेंट परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते आणि जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने वडाळानाका येथील आयशा मशिदीजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. या चौकशीत आरोपीने उपनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला उपनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलिस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, पोलिस हवालदार चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, पोलिस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते, प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजीरे आणि सुनील खैरनार यांनी केली.

Crime Branch nabs habitual burglar.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago