गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद
सिडको : प्रतिनिधी
नाशिकरोडमधील मालधक्का रोड परिसरात बेकायदेशीर शस्त्राच्या व्यवहारावर गुंडाविरोधी पथकाने मध्यरात्री धडक कारवाई करत गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, शस्त्र व्यवहाराशी संबंधित पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (4 जुलै) पहाटे सुमारे 1.33 वाजता मालधक्का रोडवरील एचपी गॅस गोडावूनलगतच्या मोकळ्या जागेत काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलीस शिपाई राकेश राऊत व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाड टाकून कारवाई केली.
तपासादरम्यान गोविंदा संजय साबळे (रा. भोरमळा, ओढा रोड) हा सिद्धांत सचिन धनेधर (रा. चव्हाण मळा, जय भवानी रोड), सोहिल फिरोज शेख (रा. रेल्वे कॉलनी, सिन्नर फाटा) आणि अनिकेत उर्फ केरला यांच्याकडे गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आल्याचे उघड झाले. अंगझडतीमध्ये 40 हजार रुपये किमतीचा स्टील बॉडीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत हा कट्टा मनोज डोगळे याच्याकडून विकत घेतल्याची माहिती गोविंदा साबळे याने पोलिसांना दिली. त्यानुसार गोविंदा साबळे, सिद्धांत धनेधर, सोहिल शेख, अनिकेत उर्फ केरला आणि मनोज डोगळे या पाच जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार भामरे पुढील तपास करीत आहेत.
Attempt to sell weapons on Maldhakka Road foiled.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…