नाशिक

फॅन्सी छत्र्या, रेनकोटच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पावसापासून बचावासाठी विविध रंगांच्या, आकाराच्या रेनकोट, छत्री खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. यंदा उशिराने पावसाचे आगमन झाले. त्यानंतर शहरातील बाजारपेठेत ठिकठिकाणी पावसापासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी असणारे साहित्य म्हणजेच छत्र्या, रेनकोट मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले. लहान मुलांसाठी भीम, मोटू-पतलू, डोरेमॉन, चुटकी, झुझु कार्टून्सचे चित्र असलेल्या छत्र्यांचा पर्याय आहे. लहान मुलींची पसंती बार्बी डॉलचे चित्र असणार्‍या छत्रीला आहे. तरुणींसाठी खास फॅन्सी डिझाइनमधील छत्र्या उपलब्ध आहेत. अनेक ग्राहकांची पसंती आठ काडी, बारा काडी या प्रकारातील छत्र्यांना आहे. महिलांची पसंती टू-फोल्ड, थ्री-फोल्ड पद्धतीच्या छत्र्यांना आहे. रेनकोट, जर्किंग खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल आहे.
नागरिकांची यंदा फॅन्सी व टिकाऊ रेनकोटला पसंती आहे. त्यांच्या किमतीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन्ही बाजूने वापरता येणार्‍या रेनकोटची मागणी अधिक आहे. लहान मुलांसाठी कार्टून्सचे चित्र असलेले रेनकोट उपलब्ध आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी दप्तरासाठी स्पेशल बॉक्स बनवलेले रेनकोटही बाजारात विक्रीसाठी आले आहेत. छत्री, रेनकोटबरोबर ताडपत्रीलाही मागणी आहे. ताडपत्रीचे एक पान सध्या 300 ते 350 रुपयांना विकले जात आहे.

बाजार स्टॉलवर छत्र्यांचीदेखील मागणी वाढली आहे. छत्र्या पाचशे ते एक हजार रुपयांत उपलब्ध आहेत. तरुणाईची पसंती मात्र फॅन्सी छत्र्यांना असून, त्या 90 ते 150 रुपयांना उपलब्ध आहेत.
– किरण देवरे, छत्री विक्रेता

विविध छत्र्यांचे दर (रुपयांत)
बारा काडी छत्री  :           150 ते 200
आठ काडी छत्री  :          120 ते 150
फोल्डिंग छत्री :             150 ते 200
जम्बो फोल्डिंग छत्री :   200 ते 250
थ्री फोल्ड छत्री :            200 ते 250
लहान मुलांसाठी छत्री : 80 ते 150
लहान मुलांचा रेनकोट : 200 ते 250
फॅन्सी रेनकोट :            300 ते 700

यूज अ‍ॅन्ड थ्रो रेनकोटला पसंती
अचानक पाऊस आल्यास त्यापासून बचावासाठी यूज अ‍ॅन्ड थ्रो रेनकोटला पसंती मिळत आहे. अवघ्या 50 ते 100 रुपयांना मिळणार्‍या या रेनकोटला विशेष करून पर्यटनस्थळी अधिक पसंती मिळते.

Crowd of customers buying fancy umbrellas and raincoats.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

19 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

19 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

20 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

20 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

20 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

20 hours ago