नाशिक

पावसाचा फटका; भाजीपाला कडाडला

गृहिणींचे बजेट कोलमडले

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील भाजीपाला बाजारात दरवाढीची झळ अधिक तीव्र झाली आहे. पावसामुळे अनेक भागांतील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, शेतात पाणी साचल्याने भाजीपाला काढणीला विलंब झाला आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटल्याने किरकोळ बाजारात बहुतांश भाज्यांचे दर वाढले आहेत. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या कडक उन्हामुळे शेतातील भाजीपाला काढणीला वेग आला असला, तरी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम अद्याप बाजारावर दिसत आहे. बाजारात दर्जेदार भाजीपाला कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने व्यापार्‍यांकडून वाढीव दर आकारले जात आहेत. टोमॅटो, गवार, भेंडी, डांगर, चवळी, हिरवी मिरची, पालेभाज्या तसेच इतर भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
व्यापार्‍यांच्या मते, पुढील काही दिवस हवामान अनुकूल राहिले आणि बाजारातील आवक वाढली तर दरात काही प्रमाणात घट होऊ शकते. मात्र, पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या स्वयंपाकासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. महागाईचा आणखी एक फटका बसत आहे. बाजारातील आवक सुरळीत झाल्यानंतरच भाजीपाल्याच्या दरात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाजीपाल्याचे दर असे (प्रतिकिलो रुपयांत)
टोमॅटो 40 ते 50 रुपये, बटाटा 40 ते 50, कांदा 40 ते 50, भेंडी 70 ते 90, गवार 90 ते 120, दुधी भोपळा 50 ते 60, डांगर 80 ते 100, चवळी 60 ते 80, वांगी 60 ते 80, ढोबळी मिरची 70 ते 90, हिरवी मिरची 100 ते 120, दोडका 50 ते 70, कारले 70 ते 90, काकडी 40 ते 50. पालक 40 ते 50 रुपये जुडी, मेथी 40 ते 50 जुडी, शेपू 40 ते 50 जुडी, कोथिंबीर 40 ते 60 रुपये जुडी.

Rain takes its toll; vegetable prices skyrocket.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

20 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

20 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

20 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

21 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

21 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

21 hours ago