नाशिक

शहरातील वाहतूक कोंडीला लगाम

पन्नास मुख्य चौकांत उपाययोजना

♦ चौक सुधारणा आराखड्यास मंजुरी

♦ अठरा कोटींचा खर्च

नाशिक : प्रतिनिधी
शहरात वारंवार होणार्‍या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या वाहतूक शाखेने चौक सुधार आराखडा तयार करत शहरातील अत्यंत वर्दळी असलेल्या प्रमुख पन्नास चौकांवर काम केले जाणार आहे. याद्वारे होणारी वाहतूक कोंडी कमी केली जाणार असून, याकरिता राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन कॅप) अंतर्गत सतरा कोटी 94 लाखांचा खर्च असून, त्यास महासभेने मंजुरी दिली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरातील विविध मुख्य रस्ते विकसित होत आहेत. या रस्त्यांवर अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे अपघात व प्रदूषण होत आहे. यास्तव मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी मुख्य चौक विकसित करण्याचे नियोजन आहे. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर महासभेनेदेखील या कामास हिरवा कंदील दिला आहे. दरम्यान, विकास आराखड्यानुसार महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र सुमारे 267.4 चौ.कि.मी. असून, शहर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून, औद्योेगिक स्वरूपातही नावारूपाला येत आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहरात दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होत असते, कुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक येत असतात. शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत सुमारे 20 लाखांच्या पुढे असून, तेवढ्याच प्रमाणात वाहनांच्या संख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे मात्र वाहतूक कोंडी, प्रदूषणात व अपघातात वाढ होत आहे. तसेच कुंभमेळा कालावधीत वाहनांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. सदर चौक सुधारणा आराखड्यामध्ये चौकामध्ये सद्यस्थितीत होणारी रहदारी व रहदारीतील विविध प्रकारच्या वाहनांची संख्या मोजणे, चौकांची संरचना करणे, सिम्युलेशन मॉडेल तयार करणे व नकाशा अंतिम करून त्यानुसार सिंहस्थ अंतर्गत रस्त्यांच्या चौकांचे आराखडे तयार करून सुशोभीकरण केले जाणार आहे. याद्वारे अपघात कमी करण्याबरोबरच ब्लॅक स्पॉटचे निराकरण केले जाणार आहे.

ही कामे होणार
सुशोभिकरण-लॅण्डस्केपिंग, म्युरल,विद्युतीकरण,
रोड फर्निचर थर्मोप्लास्टिकपेन्ट,स्थापत्य चॅनललायझर, केट आय, बोलार्ड्स, स्पिडटेबल, मार्गदर्शक फलक, डेलनेटर्स, ब्लिकर्स
स्थापत्य चॅनलायझर, आयलॅण्ड, फूटपाथ, दुभाजक

या चौकांचे होणार काम
त्रिमूर्ती चौक, सह्याद्री हॉस्पिटल, साईनाथ चौफुली-
सारडा सर्कल, चांडक सर्कल, अशोका स्कूल, नवीन नाशिक मनपसंद स्वीट, ड्रीम कॅस्टल चौक, सैलानीबाबा चौक, पाइपलाइन रोड, आंबेडकर चौक म्हसरूळ गाव, महात्मानगर आरबीसी जंक्शन, जुना सायखेडा रोड जेलरोड, माउली लॉन्स, मखमलाबाद नाका, सिम्बायोसिस स्कूल चौक, वॉस्को चौक नाशिकरोड, दक्षिणमुखी हनुमान मंदिर उंटवाडी, शरणपूररोड, धनलक्ष्मी लॉन्स संभाजीनगर, जयशंकर सर्कल, एक्स्लो पॉइंट, आरडी सर्कल, वॉस्को रोड नाशिकरोड, नंदन स्वीट कॉलेज रोड, कलानगर-वडाळा-पाथर्डी मार्ग, भारतनगर चौफुली, डीजीपीनगर-पेट्रोलपंप वडाळागाव, मार्केट यार्ड-दिंडोरी रोड, बारदान फाटा, जेहान सर्कल, आरटीओ कॉर्नर, उपनगर, काठे गल्ली सिग्नल, पेठरोड मार्केट, दत्त चौक नाशिकरोड, रिलायन्स पेट्रोलपंप कंसारा माता चौक म्हसरूळ, वेद मंदिर, कार्बन नाका, किलबिल स्कूल, ड्रीम सिटी टाकळी रोड, संगम चौक, हिरावाडी सिग्नल, दूर्गा चौक.

Curbing traffic congestion in the city

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गोदाघाट परिसरातील पार्किंग जमीनदोस्त

मलवाहिकांच्या वाहिन्यांसाठी निर्णय नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या व जीर्ण झालेल्या…

6 minutes ago

जनजागृतीअभावी अवयवदानाचा टक्का घसरलेलाच

नाशिक : देवयानी सोनार मृत्यू हा अटळ असला तरी अवयवदानाच्या रूपाने इतरांच्या जीवनात आशेचा किरण…

24 minutes ago

नाशिक न्यायालयालाही पुन्हा धमकीचा ई-मेल सहावा मजला बॉम्बने उडविण्याचा उल्लेख

न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ सिडको : प्रतिनिधी पुणे न्यायालयाला धमकी मिळाल्याच्या घटनेनंतर आता नाशिक…

1 hour ago

नैताळे येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार

एक जण गंभीर जखमी, संशयित फरार निफाड : तालुका प्रतिनिधी राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे कायदा व…

1 hour ago

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ आता बंद

काम रखडवले तर अधिकार्‍यांना 25 हजारांचा भुर्दंड मुंबई : प्रतिनिधी जन्म दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा…

1 hour ago

आता फ्लॅटधारकही बिल्डिंगच्या जमिनीचे मालक!

राज्य सरकारकडून ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’चा मसुदा जाहीर मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात फ्लॅट घेणार्‍यांसाठी आतापर्यंतची सर्वांत…

1 hour ago