नाशिक

जनजागृतीअभावी अवयवदानाचा टक्का घसरलेलाच

नाशिक : देवयानी सोनार
मृत्यू हा अटळ असला तरी अवयवदानाच्या रूपाने इतरांच्या जीवनात आशेचा किरण पेरणारी अवयवदानाची चळवळ जनजागृतीचा अभाव, गैरसमज आणि अंधश्रद्धा यामुळे फारसे बाळसे धरू शकली नाही. त्यामुळे नाशिकमध्ये अवयवदानाचा टक्का हा घसरलेलाच असल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये आजही तीनशेच्या आसपास रुग्णांना किडनीची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.

अवयवदानाच्या रूपाने इतरांच्या जीवनात आशेचा किरण पेरणारे आणि मृत्यूनंतरही इतरांच्या रूपाने जिवंत राहण्याची संधी देणारे अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. जिवंतपणी किडनी, लिव्हर यांसारखे अवयव मर्यादित स्वरूपात, तर मेंदूमृत (ब्रेनडेड) अवस्थेत हृदय, फुफ्फुस, किडनी, यकृत असे महत्त्वाचे अवयवदान करून तब्बल सात जणांना नवे जीवन देण्याची ताकद या दानात आहे.
मृत्यूच्या दारात उभे असलेल्या रुग्णांना यातून नवे आयुष्य देता येते; परंतु धार्मिक गैरसमजुती, अंधश्रद्धा आणि अवयवदानाच्या प्रक्रियेबाबत असलेले गैरसमज यामुळे आजही समाज अवयवदानासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. जनजागृतीच्या अभावामुळे नाशिक जिल्ह्यात वर्षभरात केवळ सात मेंदूमृत व्यक्तींंचे अवयवदान होऊ शकले आहे. एकीकडे गैरसमजामुळे मौल्यवान अवयव मातीमोल होत असताना, दुसरीकडे नाशिकसह विभागातील तीन हजारांहून अधिक रुग्ण केवळ एका अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूशी झुंज देत आहेत. एकट्या नाशिकमध्ये 280 ते 300 रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत श्वास मोजत असल्याचे समोर आले आहे.

शहरात वर्षभरात सात अवयवदान
नाशिक जिल्ह्यात चालू वर्षात झालेल्या सात अवयवदानांपैकी पाच अवयवदान वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात, तर दोन अवयवदान नाईन पर्ल्स रुग्णालयात पार पडले आहेत. मोठी प्रतीक्षा यादी पाहून अनेक गरजू रुग्ण नाव नोंदवण्याचाही कंटाळा करत आहेत. राज्याच्या पुणे झोनमध्ये (नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी 11 जिल्ह्यांत) वर्षभरात अवघे 100 अवयवदान झाले आहेत. पुणे झोनमध्ये हृदयाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांपैकी वर्षभरात केवळ 5 ते 7 जणांनाच हृदय मिळू शकते. उरलेले बहुतांश रुग्ण अवयवाअभावी दगावतात आणि त्यांच्या जागी नवीन रुग्ण यादीत जोडले जातात, अशी चिंताजनक स्थिती आहे.अवयवदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी केवळ समाजाचीच नव्हे, तर सर्वप्रथम डॉक्टरांची मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टरांनी रुग्णाला वेळेत ब्रेनडेड घोषित करून नातेवाइकांचे योग्य समुपदेशन केले, तर अवयवदानाचा टक्का नक्कीच वाढेल.

कोणते अवयवदान करता येतात?
जिवंतपणी :
व्यक्ती दोनपैकी एक किडनी आणि यकृताचा (लिव्हर)
30 ते 40 टक्के भाग दान करू शकते.
नवे जीवन देणारे 7 अवयव (ब्रेनडेडनंतर) :
2 किडनी, 2 फुफ्फुस, हृदय, स्वादूपिंड (पॅन्क्रियाज) आणि आतडी असे 7 अवयव दान करून 7 जणांना नवजीवन मिळते.
चांगले जीवन (क्वालिटी लाइफ) देणारे अवयव (मृत्यूनंतर) :
डोळे, त्वचा, हाडे, गर्भपिशवी आणि दोन्ही हात दान करून
5 ते 6 जणांचे आयुष्य सुसह्य करता येते.

वर्षभरात 11 जिल्ह्यांत केवळ 100 अवयवदान होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अवयव वेळेवर न मिळाल्याने प्रतीक्षा यादीतील अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत, ज्यात तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. शासनाने केवळ एक दिवस किंवा आठवडा साजरा न करता वर्षभर यावर ठोस काम करावे. नागरिकांनीही गैरसमज बाजूला ठेवून अवयवदानासाठी पुढे यावे आणि गरजूंनी वेळेत नाव नोंदवावे.            – डॉ. संजय रकिबे

अवयवांच्या प्रतीक्षेतील रुग्ण
महाराष्ट्राच्या अवयव प्रत्यारोपण नियोजनानुसार पुणे झोनमध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागात अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या खालीलप्रमाणे आहे :
अवयवाचे नाव प्रतीक्षा यादीतील रुग्णसंख्या
किडनी (मूत्रपिंड) 2,200 ते 2,300
लिव्हर (यकृत) 900 ते 1,000
हृदय (हार्ट) 50 ते 60
फुफ्फुस (लंग्स) 35 ते 40

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गोदाघाट परिसरातील पार्किंग जमीनदोस्त

मलवाहिकांच्या वाहिन्यांसाठी निर्णय नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या व जीर्ण झालेल्या…

6 minutes ago

शहरातील वाहतूक कोंडीला लगाम

पन्नास मुख्य चौकांत उपाययोजना ♦ चौक सुधारणा आराखड्यास मंजुरी ♦ अठरा कोटींचा खर्च नाशिक :…

58 minutes ago

नाशिक न्यायालयालाही पुन्हा धमकीचा ई-मेल सहावा मजला बॉम्बने उडविण्याचा उल्लेख

न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ सिडको : प्रतिनिधी पुणे न्यायालयाला धमकी मिळाल्याच्या घटनेनंतर आता नाशिक…

1 hour ago

नैताळे येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार

एक जण गंभीर जखमी, संशयित फरार निफाड : तालुका प्रतिनिधी राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे कायदा व…

1 hour ago

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ आता बंद

काम रखडवले तर अधिकार्‍यांना 25 हजारांचा भुर्दंड मुंबई : प्रतिनिधी जन्म दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा…

1 hour ago

आता फ्लॅटधारकही बिल्डिंगच्या जमिनीचे मालक!

राज्य सरकारकडून ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’चा मसुदा जाहीर मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात फ्लॅट घेणार्‍यांसाठी आतापर्यंतची सर्वांत…

1 hour ago