नाशिक

नैताळे येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार

एक जण गंभीर जखमी, संशयित फरार

निफाड : तालुका प्रतिनिधी
राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच निफाड तालुक्यातील नैताळे येथे भरदुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गावाला पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाकीजवळ गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात श्रावण सुरेश पिंपळे (रा. नैताळे) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण सुरेश पिंपळे आणि राहुल वाघमारे (रा. गणेशनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हे दोघे नैताळे गावातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली थांबले होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. श्रावण पिंपळे याने राहुल वाघमारे याला पोलिसांना शरण जाण्याचा सल्ला दिला; त्याचा राग आल्याने वाघमारे याने गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबारात श्रावण पिंपळे याच्या पाठीमागील बाजूस कमरेत गोळी लागली. जखमी श्रावण पिंपळे याला तातडीने निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्याला नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. श्रावणला रुग्णालयात दाखल केल्यानंतर गोळीबाराची माहिती समोर आली. माहिती मिळताच निफाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकहीघटनास्थळी दाखल झाले असून, पाहणी करून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. गोळीबार केल्याचा संशय असलेला राहुल वाघमारे घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी निफाड पोलिसांची पथके रवाना केली आहेत. गोळीबारामागील नेमके कारण, संभाजीनगर येथील गुन्ह्याचा या घटनेशी असलेला संबंध आणि गावठी कट्टा कोठून आणला, याचा तपास निफाड पोलिस करत आहेत.

Firing from a village gate in Naitale

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गोदाघाट परिसरातील पार्किंग जमीनदोस्त

मलवाहिकांच्या वाहिन्यांसाठी निर्णय नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या व जीर्ण झालेल्या…

6 minutes ago

जनजागृतीअभावी अवयवदानाचा टक्का घसरलेलाच

नाशिक : देवयानी सोनार मृत्यू हा अटळ असला तरी अवयवदानाच्या रूपाने इतरांच्या जीवनात आशेचा किरण…

24 minutes ago

शहरातील वाहतूक कोंडीला लगाम

पन्नास मुख्य चौकांत उपाययोजना ♦ चौक सुधारणा आराखड्यास मंजुरी ♦ अठरा कोटींचा खर्च नाशिक :…

58 minutes ago

नाशिक न्यायालयालाही पुन्हा धमकीचा ई-मेल सहावा मजला बॉम्बने उडविण्याचा उल्लेख

न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ सिडको : प्रतिनिधी पुणे न्यायालयाला धमकी मिळाल्याच्या घटनेनंतर आता नाशिक…

1 hour ago

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ आता बंद

काम रखडवले तर अधिकार्‍यांना 25 हजारांचा भुर्दंड मुंबई : प्रतिनिधी जन्म दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा…

1 hour ago

आता फ्लॅटधारकही बिल्डिंगच्या जमिनीचे मालक!

राज्य सरकारकडून ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’चा मसुदा जाहीर मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात फ्लॅट घेणार्‍यांसाठी आतापर्यंतची सर्वांत…

1 hour ago