नाशिक

‘स्वीकृत’च्या वादावर अखेर पडदा

सूफी जीन यांच्या प्रयत्नांना सुरुंंग; अर्ज फेटाळला

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून नाशिक महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या अकराव्या जागेवरून निर्माण झालेल्या वादावर शुक्रवारी (दि.6) पडदा पडला. प्रशासनाने स्वीकृत सदस्यपदासाठी भाजप, शिंदेसेना, उबाठा आघाडीने दाखल केलेले दहा अर्जच वैध ठरविले आहेत. तसेच या सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव येत्या महासभेवर सादर केल्याने आता महापौरांकडून फक्त या नावांची औपचारिकपणे घोषणा करणे बाकी आहे. दरम्यान, कॉँग्रेसचे सूफी जीन आठवडाभरापासून भाजपच्या मदतीने ‘उबाठा’वर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र होते. पण, प्रशासनाने जीन यांनी ज्या सदस्यासाठी अर्ज सादर केला होता, तो प्रशासनाने फेटाळला.
आयुक्त मनीषा खत्री यांनी शुक्रवारी (दि. 6) अर्जांची छाननी केली असता, सूफी जीन यांचा अर्ज फेटाळण्यात आला. जीन गटनेते नसल्याने आणि त्यांची ठाकरे गटासोबत आघाडी असल्याने त्यांचा अर्ज निकाली काढला. नियमाप्रमाणे कागदपत्रांची छाननी केल्याने दहा अर्ज वैध ठरविण्यात आले. दरम्यान, महापालिकेतील स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीवरून ठाकरे गट व कॉँग्रेसच्या सूफी जीन यांच्यात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. काँग्रेसचे नगरसेवक जीन यांनी स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपचे माजी नगरसेवक सुनील आडके यांचा अर्ज टपालाने पाठवला होता. पण, जीन अधिकृत गटनेते नसल्याने महापालिका आयुक्त खत्री यांनी त्यांनी केलेला अर्ज फेटाळून लावला आहे.
दरम्यान, ‘उबाठा’ने मंगळवारी (दि.3) हेमंतकुमार गायकवाड आणि बाबा गायकवाड या दोघांचे स्वीकृतसाठी अर्ज आयुक्तांकडे सादर केले होते. त्यानंतर बुधवारी (दि. 4) शिंदेसेनेकडून बाबूराव आढाव आणि चंद्रकांत लवटे यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजपकडून प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण, नामको बँकेचे माजी अध्यक्ष हेमंत धात्रक, माजी नगरसेवक संदीप लेनकर, भाजपच्या प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष व भाजपचे तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी व रामहरी संभेराव यांचे अर्ज दाखल केले होेते. मात्र, काँग्रेसचे जीन यांनी टपालाद्वारे आडके यांचा अर्ज पाठवल्याने या निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट आला होता. यावरून ठाकरे गट व काँग्रेसच्या सूफी जीन यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ‘उबाठा’चे गटनेते केशव पोरजे यांनी हरकत घेत, जीन यांनी दाखल केलेल्या अर्जावरून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.

स्वीकृतची पक्षनिहाय संख्या
भाजपकडे सर्वाधिक 72 नगरसेवक असल्याने त्यांना दहापैकी तब्बल सहा जागा, शिवसेने(शिंदे गट)ला दोन, तर उबाठा-काँग्रेस गटाच्या वाट्याला दोन याप्रमाणे जागांचे समीकरण ठरले आहे. स्वीकृतसाठी या तिन्ही पक्षांतील इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षाची डोकेदुखी वाढल्याचे चित्र होते.

महापौर करणार नावांची घोषणा
पुढील आठवड्यात महासभा होत असून, त्यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्याकडून स्वीकृत सदस्यांच्या नावांची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव हा महासभेच्या मान्यतेसाठी दाखल करण्यात आला आहे.

वैध ठरलेल्या सदस्यांची नावे
भाजप : अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी नायडू, चंद्रशेखर पंचाक्षरी, रामहरी संभेराव, संदीप लेनकर
शिंदेसेना : बाबूराव आढाव, चंद्रकांत लवटे
उबाठा : हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड

Curtain finally falls on the ‘Swikrut’ controversy

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गावांच्या सुरक्षेची धुरा तरुणांच्या खांद्यावर; 33 गावांत ग्रामरक्षक दलाचा पहारा!

वावी पोलिसांचा अनोखा उपक्रम; 327 तरुण मध्यरात्री 12 ते पहाटे 4.30 पर्यंत घालतात गस्त सिन्नर…

7 hours ago

सातपूरमधील चाकूहल्ला, आरोपीला पाच वर्षे कारावास

भांडण सोडविण्यास गेलेल्या चुलतभावाचा चाकूच्या वारात झाला होता मृत्यू सिडको : प्रतिनिधी किरकोळ वादातून झालेल्या…

7 hours ago

मुकणे धरणात बुडालेले दोन जण बेपत्ताच

आमदार खोसकरांकडून घटनास्थळी पाहणी घोटी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणात दोन तरुण बुडाल्याची दुर्दैवी…

8 hours ago

सटाणे कर्‍ही गावात एकाच रात्री 5 ठिकाणी सशस्त्र दरोडे

मनमाड : प्रतिनिधी मनमाड परिसरासह ग्रामीण भागात दरोडे व चोर्‍यांचे सत्र वाढले आहे. गुरुवारी मध्यरात्री…

8 hours ago

सटाण्यात तोतया एफडीआय अधिकार्‍यांचा पर्दाफाश

मिठाई दुकानात तपासणीच्या नावाखाली दिशाभूल करणारे तिघे जेरबंद सटाणा : प्रतिनिधी शासकीय अधिकारी असल्याची बतावणी…

8 hours ago

सिन्नर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी

सिन्नर : प्रतिनिधी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून,…

8 hours ago