नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे

बनावट लिंक, ओटीपी व ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा : मनोहर क्षीरसागर

पंचवटी : प्रतिनिधी
डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम किंवा कार्डचे तपशील, तसेच वैयक्तिक माहिती देऊ नये. संशयास्पद लिंकवर क्लिक करण्याचे टाळावे आणि फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय, मखमलाबाद येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बुधवारी (दि. 30 सप्टेंबर) मखमलाबाद सार्वजनिक वाचनालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सायबर गुन्हे प्रतिबंध व डिजिटल सुरक्षितता’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. य
ावेळी प्रमुख वक्ते म्हणून पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर बोलत होते.
डिजिटल व्यवहार करताना नागरिकांची होणारी फसवणूक, बनावट लिंक, ओटीपीच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बँकिंग माहिती मिळविण्याचे प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, तसेच ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.
सायबर गुन्हेगारांकडून विविध आमिषे दाखवून अथवा भीती निर्माण करून नागरिकांकडून गोपनीय माहिती मिळविली जाते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोन, संदेश किंवा लिंकवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्राचार्यांची प्रमुख उपस्थिती होती. मखमलाबाद सार्वजनिक वाचनालय व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास पिंगळे, कार्यवाह सूर्यभान पवार, ग्रंथपाल राजेश शिरसाठ, प्रा. आर. डी. खुर्चे, ए. पिंगळे, अर्थशास्त्र विभागप्रमुख श्रीमती के. एस. चोपडे, श्रीमती आर. बी. बरकले, श्रीमती बी. एन. वाघ यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायबर सुरक्षेबाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबरोबरच डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षितपणे करण्यासाठी आवश्यक माहिती या उपक्रमातून देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा जनजागृतिपर कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Cyber ​​security lessons for senior citizens in Nashik

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *