नाशिक

पंपमालकावर मद्यपी कामगाराचा जीवघेणा हल्ला

घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद; दारू पिऊन का आलास, विचारल्याने राग

निफाड तालुका : प्रतिनिधी
दारू पिऊन पेट्रोलपंपावर कामावर येऊ नको, या कारणास्तव कामगाराने पेट्रोलपंप मालकावर लोखंडी रॉडने रात्रीच्या वेळी जीवघेणा हल्ला केला. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात हल्लेखोर युवकावर गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवकास ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, पालखेड येथील पालखेड- लोणवाडी रस्त्यालगत शरद आहेर यांच्या मालकीच्या आर.जी. आहेर पेट्रोलपंपावर अंकित रमेश घोलप काही दिवसांपासून काम करत होता. घटनेच्या दिवशी तो दारू पिऊन कामावर आला. रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास पेट्रोलपंप मालकाने, तू दारू पिऊन कामावर का आलास, असा जाब विचारला. दारू पिऊन कामावर येऊ नको, असे सांगितल्याचा राग आल्याने सदर युवकाने शरद आहेर यांना दम देत तुझा काटाच काढतो, असे बोलत शिवीगाळ केली. कार्यालयाबाहेर जात, काही वेळाने तो युवक पुन्हा कार्यालयात येत कसलाही विचार न करता, खुर्चीवर बसलेले पंपाचे मालक शरद आहेर यांच्या डोक्यात रॉडने सपासप वार करत आहेर यांना रक्तबंबाळ केले व तेथून पळ काढला. बेशुद्धावस्थेत असलेल्या शरद आहेर यांना काही नागरिकांनी तत्काळ येथील रुग्णालयात हलवले असता, परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तत्काळ नाशिकला हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घडलेली संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याने पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला अटक केली. हवालदार चंद्रकांत निकम तपास करीत आहेत.

बेरोजगार असल्याने या युवकाला पेट्रोलपंपावर वाहनांत पेट्रोल भरण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वीच ठेवले होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दोन पैसे मिळतील, त्याला दारूचे व्यसन आहे हे माहिती नसल्याने घटना घडली. माझ्यावरील जीवघेणा हल्ल्याची तीव्रता एवढी भयानक होती की, मी काहीही करू शकलो नाही. पोलिस प्रशासनाने या युवकास कठोर शासन करावे, जेणेकरून पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत.
-शरद आहेर, आर. जी. आहेर पेट्रोलपंपाचे मालक

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago