श्री मूर्तीला 51 लिटर दुधाचा पंचामृत अभिषेक
नाशिक : प्रतिनिधी
जेलरोड येथील प्रभाग अठरातील वसंत विहार येथील श्रीकृष्ण मंदिरात श्री दत्तात्रय प्रभू महाराज जयंती उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भगवान दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव प्रभागातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधीद्वारे केला गेला.
प्रभाग अठरातील भाजपचे माजी नगरसेवक तथा नाशिकरोड विभागाचे सभापती विशाल संगमनेरे यांच्या सर्वज्ञ सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी हा उत्सव आयोजित केला जातो. यंदाही मोठ्या उत्साहाने जन्मोत्सव साजरा केला गेला. यावेळी आ. राहुल ढिकले यांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेत त्यांच्या हस्ते धार्मिक विधी
पार पडला.
जन्मोत्सव सोहळ्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय पदधिकार्यांनी हजेरी लावत भगवान कृष्णाचे दर्शन घेतले. दरम्यान, बुधवारी (दि.3) सायंकाळी दुपारी चार वाजता वसंत विहार येथून भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेत प्रभागातील हजारो नागरिकांनी सहभाग घेत शोभा वाढवली. रात्री नऊ वाजेपर्यंत ही रथयात्रा
सुरू होती.
दरम्यान, गुरुवारी (दि.4) सकाळी नऊ वाजता दत्तात्रय कवच सामुदायिक पठण करण्यात आले. तद्नंतर श्री मूर्तीला 51 लिटर दुधाचा पंचामृत अभिषेक करून आरती घेण्यात आली. यावेळी दत्तात्रयांचा जयघोष करण्यात आला. दर्शनासाठी पुरुषांसह महिलांची लक्षणीय गर्दी सकाळपासूनच श्रीकृष्ण मंदिरात होती. यावेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आकर्षक सजावटीने वेधले लक्ष
वसंत विहार येथील भगवान श्रीकृष्ण मंदिराला सुंदर अशी फुलांची सजावट केल्याने वातावरण प्रसन्न होते. शिवाय, येणार्या प्रत्येकाचे लक्ष या सजावटीद्वारे वेधले जात होते.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…