पळसे-बाभळेश्वर रस्त्यावर मृत कोंबड्या फेकल्या

नागरिकांचे आरोग्य धोक्यात; कारवाईची मागणी

नाशिकरोड : प्रतिनिधी
पळसे-बाभळेश्वर रस्त्यालगत रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने मृत कोंबड्या टाकल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, वाहनचालक तसेच परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य अजित गायधनी यांना दूरध्वनीवरून माहिती देताच सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने जेसीबी बोलावून मशीनच्या सहाय्याने त्या उचलत खड्डा खोदून त्यात त्या गाडण्यात आल्याने गायधनींच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
पळसे परिसरातील नाशिक साखर कारखाना कार्यक्षेत्रातदेखील महिन्यापूर्वी अशाच मृत कोंबड्या अज्ञातांनी रात्रीच्या वेळी टाकल्या होत्या. तर महिनाभरातील दुसरा प्रकार असून, ग्रामपंचायतीने संबंधित ज्या ज्या ठिकाणी पोल्ट्री असेल, त्या पोल्ट्रीधारकांना तातडीची नोटीस देऊ, अशा कोंबड्या मृत झाल्यास जागेवर त्याची विल्हेवाट लावावी जेणेकरून मृत कोंबड्यांची दुर्गंधी पसरणार नाही. मात्र, इतरत्र असा मृत कोंबड्या अथवा मृत प्राणी उघड्यावर टाकल्याने मोठा भयंकर रोग येऊन जीवितहानी होऊ शकते. यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी दत्तू गायधनी, अजय गायधनी, नितीन गायधनी, निवृत्ती गायधनी, योगेश गायधनी, सोमनाथ गायधनी, सुनील गायधनी आदींसह स्थानिक रहिवाशांनी
केली आहे.
परिसरात मृत कोंबड्या टाकण्याचा प्रकार घडत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. मृत कोंबड्यांची योग्य विल्हेवाट न लावता त्या उघड्यावर टाकल्या जात असल्यास त्यातून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागला. मृत कोंबड्या नेमक्या कोण टाकत आहे, याचा शोध घेण्याची गरज असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित यंत्रणेने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन मृत कोंबड्या उघड्यावर टाकणार्‍यांचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तर माजी सरपंच अजित गायधनी यांना फोन करण्यापूर्वी इतरांनादेखील फोन केला, मात्र कोणी आले नाही.
मात्र अजित गायधनी यांनी घटनास्थळी येऊन स्वतः मृत कोंबड्या उचलण्यासाठी मशीन बोलावून खड्डा खोदून त्यात त्या कोंबड्या टाकत नष्ट केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मृत कोंबड्या टाकणार्‍यांवर कारवाई करणार

महिनाभरात मृत कोंबड्या टाकण्याचा हा दुसरा प्रकार असून, यापूर्वीदेखील नासाका कार्यक्षेत्रात मृत कोंबड्या रात्रीच्या वेळी टाकण्यात आल्या होत्या. काल पळसे झोटिंग बाबालगत अगदी येण्या-जाण्याच्या मुख्य रस्त्यावर मृत कोंबड्या टाकल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. मात्र, आमचे वॉर्ड क्र. 2 चे सदस्य अजित गायधनी यांनी स्वतः रविवार असतानादेखील जागेवरती जाऊन मृत कोंबड्या उचलण्यास मदत करत नागरिकांचा आरोग्यसंदर्भातील प्रश्न मार्गी लावला आहे. मात्र, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगत पोल्ट्रीधारकांची एकत्रित बैठक घेऊन यासंदर्भात सूचना देऊ, असे सांगितले.
– सोनाली पगारे, ग्रामपंचायत अधिकारी, पळसे

 

Dead chickens dumped on the Palse-Babhaleshwar road.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *