महाराष्ट्र

लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास प्रारंभ

मुंबई : राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या फेब्रुवारी महिन्यातील निधी वितरणाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून अधिकृतपणे सुरू केली आहे. याबाबतची माहिती मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे.
राज्याच्या महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपयांचे अर्थसहाय्य लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात वर्ग करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली दिसेल.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने दरमहा 1500 रुपये दिले जातात. फेब्रुवारी महिन्याचा लाभ कधी मिळणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून महिलांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता प्रत्यक्ष निधी वाटप सुरू झाल्याने कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे आणि ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे, अशा महिलांना प्राधान्याने हा लाभ मिळत आहे.मंत्री अदिती तटकरे याविषयी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.

Dear sisters, the February installment has started to be collected.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

21 hours ago