राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांची इराणला पुन्हा मुदतवाढ; वाटाघाटीचे दावे इराणने फेटाळले

तेहरान/वॉशिंग्टन/तेल अवीव :
पश्चिम आशिया युद्धाचा 27 वा दिवस आणि युद्धनीतीचा गुंता आणखी घट्ट झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले पुन्हा एकदा स्थगित ठेवण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केले की, इराण सरकारच्या विनंतीनुसार ऊर्जा प्रकल्पांवरील हल्लेे 6 एप्रिल रात्री 8 वाजेपर्यंत स्थगित राहतील आणि चर्चा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. मात्र, इराणने लगेचच हे दावे फेटाळले.
अमेरिकेशी कोणत्याही थेट वाटाघाटी सुरू नाहीत आणि ट्रम्प यांचा दावा निराधार असल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. ट्रम्प ’डील’ म्हणत आहेत. इराण ’नाही’ म्हणत आहे आणि जग श्वास रोखून बघत आहे! 6 एप्रिलची मुदत हीच आता जगाची पुढली वाट ही शांततेची की महायुद्धाची हे ठरवणार आहे.
रणांगणावर मात्र एकही क्षण विराम नाही. इराणच्या आयआरजीसीने ’ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4’ची 83 वी लाट यशस्वीरीत्या राबवल्याची घोषणा केली. क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या या संयुक्त हल्ल्यात इस्रायलमधील अशदोद तेलसाठे आणि मोदिइनमधील लष्करी ठाणी लक्ष्य करण्यात आली. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने इराणच्या इस्फाहान येथे मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आणि आयआरजीसी नौदलप्रमुखाला ठार केल्याचा दावा केला. इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये प्रत्यक्ष भूमी कारवाई सुरू ठेवली आहे. बेरुतच्या दक्षिण उपनगरात एका निवासी इमारतीवर हल्ल्यात मोठा विध्वंस झाल्याचे वृत्त आहे.

हॉर्मुझ सुरक्षेसाठी बहुराष्ट्रीय नौदल पथक

रशियाच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची इराणविषयक बंद दरवाजाआड बैठक शुक्रवारी (दि. 27) सकाळी पार पडली. दरम्यान, यूएईने अमेरिका आणि पाश्चात्य मित्र राष्ट्रांना हॉर्मुझ सुरक्षित ठेवण्यासाठी बहुराष्ट्रीय नौदल पथकात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. डझनभर देशांना या ’हॉर्मुझ सुरक्षा दला’त सामील करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Trump extends Iran deadline again; Iran rejects claims of negotiations

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

7 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago