आज दीप अमावास्या खवय्यांची मात्र गटारी!

नाशिक : अश्‍विनी पांडे
आज दीप अमावास्या. चातुर्मासातील पहिली अमावास्या आषाढ अमावास्या असते. आषाढ एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यातील दीप अमावास्या समाप्तीनंतर श्रावण मासाला प्रारंभ होणार आहे. श्रावणातला जवळजवळ प्रत्येक दिवस काही ना काही उपवासाच्या सणांशी संबंधित असतो. आज दीप अमावास्या प्रारंभ होणार असून, या वर्षी 28 जुलै रोजी दीपपूजन केले जाणार आहे. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते. दिवा लावला जातो आणि दानधर्म केले जाते. दीप अमावास्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, या वर्षी अमावास्या तिथी बुधवार, 27 जुलै रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल. जी 28 जुलै रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटांपर्यंत आहे. या दिवशी गुरुपुष्ययोगासोबत अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धीसारखे महायोग आहेत. लोक या दिवशी उपवास देखील करतात. अग्निप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला दीपपूजन केले जाते.
मांसाहारींची पंचाईत
आज दीप अमावास्या त्याचप्रमाण गटारीदेखील आहे. दीप अमावास्येनंतर श्रावण मासाला प्रारंभ होणार असल्याने श्रावणात मांसाहार घेण्याचे टाळले जाते. त्यामुळे मांसाहारप्रेमी खवय्यांकडून गटारीचे औचित्य साधत मांसाहारावर ताव मारला जातो. मात्र, यंदा गटारी गुरुवारी आल्याने मांसाहार करणार्‍यांची पंचाईत झाली. त्यामुळे अनेकांनी कालच गटारी साजरी केली. त्यामुळे दीप अमावास्येप्रमाणे गटारीही साजरी करण्याची परंपरा आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago