राज ठाकरे यांच्या पदाधिकार्यांना सूचना
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दोन दिवसीय नाशिक दौरा गुरुवारी सुरू झाला. शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि महापालिकेच्या कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मनसेच्या पदाधिकार्यांना नागरिकांच्या प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे निर्देश दिले. महापालिकेत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शहराची ही अवस्था का झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांचे सकाळी मुंबई नाका येथे आगमन होताच शेकडो कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात शहर व जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. बैठकीत शहरातील खड्डे, वाहतूक कोंडी, रखडलेली विकासकामे आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीवर चर्चा झाली. सत्ताधारी नगरसेवक त्यांच्या कामगिरीबाबत समाधानी आहेत का, असा सवाल करत त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा उभारण्याचे आवाहन केले.
दुपारच्या सत्रात विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी शहरातील खड्डे, खराब रस्ते आणि महापालिकेच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे प्रतिनिधींनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, नगरसेविका मयुरी पवार तसेच शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
‘एसआयआर’ मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवा
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘एसआयआर’ मोहिमेवर कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे, असे निर्देश राज ठाकरे यांनी दिले. पश्चिम बंगालमध्ये ‘एसआयआर’ प्रक्रियेदरम्यान झालेल्या कथित गोंधळाचा उल्लेख करत महाराष्ट्रात तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक इच्छुक उमेदवाराने मतदार यादीची काटेकोर पडताळणी करावी, असे त्यांनी सांगितले. समर्थक आणि सहानुभूतीदारांची नावे मतदार यादीत नसतील तर कितीही सामाजिक काम केले तरी त्याचा निवडणुकीत फायदा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांकडून आयआयटीसारख्या संस्थेची मागणी
कॉलेज रोडवरील एका खासगी कोचिंग संस्थेतील विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन नीट पेपरफुटी, नाशिकमधील खड्डे, वाहतूक कोंडी आणि उच्च शिक्षणाच्या सुविधांबाबत चर्चा केली. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागते. त्यामुळे नाशिकमध्ये आयआयटीसारखी मोठी शैक्षणिक संस्था उभारण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करू, असे आश्वासन राज ठाकरे
यांनी दिले.
Be aggressive regarding citizens’ issues.
- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…
- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…
- जगन घाणेकर यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…
तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…
नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…
समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…