नाशिक

सरदवाडी धरणात दूषित पाणी सोडणार्‍या दोषी उद्योगांवर बंदीची मागणी

पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; चार दिवसांत अहवाल सादर करण्याचे पंचायत समितीचे निर्देश

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहराला लागून असलेल्या सरदवाडी धरणात माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योगांचे सांडपाणी सोडले जात असल्याने धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
या धरणावर पाच गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून, औद्योगिक सांडपाणी मिसळत असल्याच्या तक्रारीनंतर पंचायत समिती प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या तीन दिवसांतील मुसळधार पावसामुळे औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी धरणक्षेत्रात आल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तातडीचे स्मरणपत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
सरदवाडी ग्रामपंचायतीने याबाबत पंचायत समितीकडे निवेदन सादर केल्यानंतर गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी त्वरित दखल घेतली. यापूर्वीही यासंदर्भात पंचायत समितीकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा उल्लेख स्मरणपत्रात करण्यात आला आहे.
स्मरणपत्रात धरणातील पाणी आणि संबंधित सांडपाण्याचे नमुने तातडीने तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तपासणीत दोषी आढळणार्‍या कंपन्यांवर तत्काळ उद्योगबंदीची कारवाई करून त्याचा सविस्तर अहवाल चार दिवसांच्या आत सादर करावा, असे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले आहेत.
याशिवाय, या प्रकरणातील जबाबदार कंपन्या आणि संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी तहसीलदार सिन्नर तसेच सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पाठविलेल्या पत्राद्वारे
केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागालाही देण्यात आली असून, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाच गावांच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago