त्र्यंबकेश्वर वास्तव्यास असलेल्या महंत रघुमुनींचा समावेश
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
श्री पंचायत बडा उदासीन आखाड्याने पाच साधू-महंतांना आखाड्यातून आजीवन हद्दपार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूतील कांचीपुरम येथे पार पडलेल्या श्री पंचायत आखाडा बडा उदासीन निर्वाणच्या बैठकीत या पाचही संतांचा हुक्का-पाणी बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला, अशी माहिती आखाड्याचे श्रीमहंत दुर्गादास महाराज यांनी दिली.
या बैठकीत आखाड्याच्या संघटनेशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने त्र्यंबकेश्वरचे श्रीमहंत रघुमुनी, स्थानिक महंत उग्रदास, जयेंद्र मुनी (कनखल), स्वामी शिवानंद (प्रयागराज) आणि सेवादास (हरिद्वार) यांनी आखाडा व श्री सतपंच परमेश्वर यांच्या प्रतिष्ठा आणि हिताच्या विरोधात न्यायालयासह इतर मंचांवर कृती केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आखाड्याची प्रतिष्ठा, शिस्त आणि परंपरांचे रक्षण करणे
सर्वपरी असून, भविष्यातही संस्थेच्या हिताविरुद्ध काम करणार्यांवर अशीच कारवाई केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे, अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या दुसर्या गटाने नुकतेच त्र्यंबकेश्वर येथे महंत रघुमुनी यांना बडा उदासीन आखाड्याचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून जाहीर केले होते. आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरी महाराज आणि महामंत्री श्रीमहंत हरीगिरी महाराज यांनी रघुमुनी यांच्याच सहकार्याने त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळा होईल, असे व्यासपीठावरून सांगितले होते. मात्र, आता मूळ आखाड्यानेच महंत रघुमुनी यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे आखाडा परिषदेतील दोन्ही गटांमधील संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली
जात आहे.
Five sadhus and mahants banished from the Bada Udasin Akhada.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…