नाशिक

गांजा, खसखस पिकांना अधिकृत दर्जा देण्याची मागणी

सायाळेतील कर्जबाजारी शेतकर्‍याची सरकारला विनंती

सिन्नर : प्रतिनिधी
वाढता शेतीखर्च, निसर्गाचा लहरीपणा आणि हातात न येणारे उत्पन्न या सार्‍यांतून मार्ग काढताना सिन्नर तालुक्यातील सायाळे गावातील शेतकरी विजय रामराव शिंदे यांनी शासनाकडे एक वेगळीच मागणी केली आहे. गांजा व खसखस या पिकांना अधिकृत पिकाचा दर्जा देण्यात यावा, अशी विनंती त्यांनी नाशिक जिल्हाधिकार्‍यांकडे स्मरणपत्राद्वारे केली आहे.
सन 2026-27 मध्ये होणार्‍या त्र्यंबकेश्वर-नाशिक ज्योतिर्लिंग महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी ही मागणी पुढे आणली आहे. कुंभमेळ्यादरम्यान संत-महंतांच्या सेवेसाठी गांजाची गरज भासते. मात्र, सध्या हा गांजा परराज्यातून मागवला जातो. त्यामुळे खर्च वाढतो. जर शासनाने परवानगी दिली, तर कुंभमेळ्यासाठी लागणारा गांजा सिन्नर परिसरातील शेतकरी कमी खर्चात देऊ शकतील, असा विश्वास शिंदे व्यक्त करतात.
शेतकरी आज कर्जबाजारीपणामुळे मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत कमी खर्चात आणि भरपूर उत्पादन देणारे पीक म्हणून गांजाकडे पाहिले जात आहे. शासनाच्या नियंत्रणाखाली रीतसर परवानगीने लागवड केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच शासनालाही महसूल मिळेल, असे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
राजस्थानमधील जोधपूर येथे शासनाने गांजा पिकाला अधिकृत परवानगी दिल्याचे उदाहरण देत महाराष्ट्रातही तसा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच खसखस हे आयुर्वेदिकदृष्ट्या उपयुक्त पीक असून, त्यालाही अधिकृत पिकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनापूर्वी भूमिका स्पष्ट करा

हा विषय संवेदनशील असला तरी शेतकर्‍यांच्या जीवनाशी जोडलेला असल्याचे सांगत, कॅबिनेट स्तरावर निर्णय घेऊन 26 जानेवारी 2026 पूर्वी शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री, कृषिमंत्री, उत्पादन शुल्कमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनाही या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. पिकाचा मुद्दा नाही, तर शेतीतून सावरण्याची आणि भवितव्य वाचविण्याची धडपड स्पष्टपणे दिसून येते. शासन या वेगळ्या मागणीला कसा प्रतिसाद देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Demand for official status for marijuana and poppy crops

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

10 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

11 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

11 hours ago