ओझरला मोकाट कुत्र्यांसह डुकरांचा सुळसुळाट

नागरिक त्रस्त; नगरपरिषदेने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी

ओझर : वार्ताहर
येथील ओझर व नगरपरिषद हद्दीतील ओझरसह उपनगरांत मोकाट कुत्र्यांसह डुकरांचा सुळसुळाट झाला असून, त्यांच्या उपद्रवामळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. ओझर नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांचा व डुकरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ओझरसह उपनगरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, कुत्रे घोळक्याने फिरताना दिसतात. परिसरातील पादचारी, महिला, लहान मुले शालेय विद्यार्थी तसेच मोटारसायकलस्वार, सायकलस्वार यांच्यावर धावून जातात. रात्रीच्या वेळी तर कामावरून घरी येणार्‍या मोटारसायकलस्वारांमागे कुत्रे लागल्यामुळे अपघातही होतात. विशेषतः शाळा, महाविद्यालये, दाट वस्तीचे भाग तसेच मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांत कुत्रे चावण्याच्या घटना घडल्याचे समोर आल्या. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात ये-जा करणेही धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता ओझर नगरपरिषदेकडून तातडीने उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशी मागणी आहे.
कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण व पुनर्वसनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात यावी, तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, एखाद्या मुलाने किंवा व्यक्तीने त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास एकाच वेळी कुत्र्यांची टोळी अंगावर धावून येते. कुत्र्यांच्या दोन टोळ्या समोरासमोर आल्यानंतर त्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने होणार्‍या टोळी युद्धासारख्या लढाईमुळे नागरिकांना त्रासही होतो, असे नागरिकांनी सांगितले.

Pigs roam freely with stray dogs in Ozark

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

11 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

11 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

11 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

11 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago