नाशिक

आयमा निवडणूक दुसर्‍या पॅनलची एन्ट्री

उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे यांचे गंभीर आरोप

नाशिक : प्रतिनिधी
अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स (आयमा) असोसिएशनची निवडणूकदेखील महापालिकेप्रमाणेच चांगलीच गाजणार आहे. दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच इच्छुकांनी उद्योजक एकता पॅनलची स्थापना केली आहे. छाननीमध्ये आमचे उमेदवारी अर्ज विविध मार्गाने बाद ठरवायचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दबाव आणून आमच्या पॅनलमधील विकास माथूर यांना माघार घ्यायला लावल्याचा गंभीर आरोप नुकत्याच स्थापन झालेल्या उद्योजक एकता पॅनलचे संस्थापक राजेंद्र पानसरे यांनी केला आहे.
कुणालाही विश्वासात न घेता ललित बूब यांना पुन्हा अध्यक्षपदासाठी संधी देण्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली. तरीपण आपला ग्रुप कुठेही तुटायला नको म्हणून मी त्यांच्याबरोबर निवडणूक प्रक्रियेत राहिलो. 24 तासांमध्ये संपूर्ण ताकदीने पॅनल उभे केले. परंतु, आमच्या उमेदवारांवर माघार घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत आहे, असा गंभीर आरोप राजेंद्र पानसरे यांनी केला आहे.
30 जानेवारीला मतदान तर 31 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. पदाधिकार्‍यांसह 21 जागांसाठी 2246 सभासद मतदान करणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी होणार्‍या सभेत नूतन कार्यकारिणीकडे सत्तेची सूत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.

पॅनल स्थापन; आता माघार नाही

मी कुठल्याही परिस्थितीत अध्यक्षपदासह पॅनलच्या इतर उमेदवारांची माघार घेणार नसून, पूर्ण ताकदीने पॅनलला घेऊन ही निवडणूक लढणार आहे. अध्यक्षपद सलग दुसर्‍यांदा देण्याची कुठलीही परंपरा नसताना यांना कशासाठी हे अध्यक्षपद पुन्हा द्यायचे आहे?
– राजेंद्र पानसरे, संस्थापक, उद्योजक एकता पॅनल

सर्व इच्छुकांच्या संमतीनेच निर्णय

सर्व इच्छुकांची बैठक घेतली. त्यात सर्वांनी मला आणि माजी अध्यक्षांना अधिकार दिला. त्यानंतर सर्वानुमते आम्ही ललित बूब यांना पुन्हा अध्यक्ष करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
– ज्ञानेश्वर गोपाळे, बीओपीपी, चेअरमन, आयमा

AIMA election second panel entry

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

9 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

10 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

10 hours ago