विविध प्रकारचे स्वेटर, मफलर, हुडीचे नवीन प्रकार उपलब्ध
नाशिक : वैशाली लिलके
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे नागरिक गरम कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत. बाजारपेठेत स्वेटर, जॅकेट, मफलर, शाल यांची मागणी झपाट्याने वाढली आहे. यंदा विविध प्रकारचे स्वेटर, मफलर, हुडीचे नवीन प्रकार उपलब्ध आहेत. काही दुकानदारांनी सांगितले की, सध्या सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होत आहे. सकाळी व संध्याकाळी जास्त थंडी असल्याने लोक गरम कपडे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत येत आहेत.
सर्व वयोगटातील नागरिक कपडे खरेदी करताना दिसत आहेत, तर दुकानदारांनी मागणीच्या आधारावर अतिरिक्त स्टॉल ठेवले आहेत. आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला आहे की, थंडीमध्ये शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुले व वृद्ध नागरिकांनी गरम कपडे वापरणे आवश्यक आहे. शहरात थंडीचा प्रभाव अजून काही दिवस राहण्याची शक्यता असल्याने कपड्यांच्या बाजारपेठेत सतत गर्दी आणि मागणी वाढत राहणार आहे.
थंडीचा कडाका वाढल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये स्वेटर, जॅकेट आणि उबदार कपड्यांची विक्री वाढली आहे. नाशिक येथील तिबेटियन मार्केटमध्ये स्वेटर विक्रीला सुरुवात झाली आहे. येथे स्वेटर, जॅकेट, मफलर आदी हिवाळी कपडे चांगल्या दर्जात आणि वाजवी दरात मिळत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढत आहे. दुकानदारांनी महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि मुलांसाठी विविध प्रकारचे स्वेटर, जॅकेट, शाल, मफलर आणि हुडीचे नवीन कलेक्शन उपलब्ध करून
दिले आहेत.
हिवाळा बनला स्टायलिश
लहान मुलांसाठी आकर्षक रंग आणि कार्टून डिझाइन्स असलेले स्वेटर बाजारपेठांमध्ये मिळत आहेत. किशोरवयीनांसाठी ट्रेंडी हुडी, स्टायलिश जॅकेट उपलब्ध आहेत. महिला वर्गासाठी रंगीबेरंगी फॅशनबल स्वेटर, शाल आणि स्टायलिश जॅकेट बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी फॉर्मल लूक देणारे स्वेटर, जॅकेट आणि मफलर उपलब्ध आहेत. दुकानदारांच्या मते, दरात सुमारे 10 ते 15 टक्क्यांची वाढ झाली आहे.
उबदार कपड्यांचे दर
हातमोजे – 180 ते 250, स्वेटर – 500 ते 900, लहान मुलांचे हाफ स्वेटर – 450 ते 1000, नवीन प्रकार – 900 पासून सुरू. महिला- स्वेटर 800 ते 1500. फॅशनेबल स्वेटर – 1500 ते 2000 पर्यंत. स्टॉल /शाल 300 ते 400. पुरुष स्वेटर – 800 ते 1000. ट्रेंडी हुडी -900 ते 1200. वूलन स्वेटर – 1300 पासून सुरू. मफलर आणि कानटोपी – 250 ते 400.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…