गुंडाविरोधी पथकाने दोघांना पकडले
सिडको : प्रतिनिधी
रिक्षामध्ये प्रवासी भरण्याच्या वादावरून त्र्यंबक नाका सिग्नल परिसरात एका तरुणाला दगडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न सुरू असताना गुंडाविरोधी पथकाच्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. वाहतूक पोलिसांच्या मदतीने मारहाण करणार्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे जखमी तरुणाचे प्राण वाचविण्यात मदत झाली.
ही घटना 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 7.15 वाजेच्या सुमारास घडली. गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील आडके आणि पोलीस अंमलदार गुरू गांगुर्डे हे याच परिसरातून जात असताना त्यांना मारहाणीचा प्रकार दिसला. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने घटनास्थळी थांबत वाहतूक विभागातील पोलिसांच्या मदतीने मारहाण करणार्यांना ताब्यात घेतले. जखमी प्रेम हिरे याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल
करण्यात आले.
या प्रकरणी फिर्यादी दीपक संजय पाटील यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली. पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांच्यासह अन्य अधिकारी व पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Rickshaw driver assaulted over dispute regarding picking up passengers.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…