नाशिक

संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पन्नास हजार वारकर्‍यांची उपस्थिती; व्हीआयपींच्या गर्दीमुळे नियोजनाचा बोजवारा

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शतकाची परंपरा असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी (दि. 29) पन्नास हजार वारकरी भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. सोमवारी सकाळपासूनच संत निवृत्तिनाथ मंदिर परिसरात पालखी प्रस्थानाची लगबग सुरू झाली होती. दुपारी 12 वाजता पारंपरिक पद्धतीने नारळ प्रसादाचा कार्यक्रम पार पडला. दुपारी पावणेतीनच्या सुमारास पालखी नाथांच्या संजीवन समाधी मंदिरापासून मार्गस्थ झाली. टाळ-मृदंगाचा गजर, भगव्या पताका, सजवलेले अश्व व नगार्‍याचा रथ असा डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनमनोहरी सोहळा भक्तांनी अनुभवला.

नव्या मार्गावर स्वागत अन् चिखल
शहरात सिंहस्थ विकासकामांतर्गत सुरू असलेल्या रस्ते खोदाईमुळे यंदा पालखीचा पारंपरिक मार्ग बदलून तो चौकीमाथा व तेलीगल्लीमार्गे केला होता. या भागात प्रथमच पालखी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. घराघरांमधून पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. प्रशासनाने तात्पुरते खोदकाम बुजवले असले, तरी सकाळी आलेल्या पावसाच्या सरींमुळे या नवीन मार्गावर प्रचंड चिखल झाला होता. त्यातून वारकर्‍यांना कसरत करत मार्ग काढावा लागला.

राजकीय नेत्यांची उपस्थिती
या सोहळ्यासाठी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, मनसे युवानेते अमित ठाकरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोकुळ गिते यांच्यासह देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माधवदास राठी महाराज, पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी व मानकरी उपस्थित होते. दरम्यान, मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाने इतर वाहनांना बंदी घातली होती. मात्र, पालखी प्रस्थानाच्या वेळी विविध आखाड्यांच्या साधूंचे ताफे, मंत्री, विविध पक्षांचे पुढारी आणि स्थानिक नेत्यांच्या वाहनांनी एकच गर्दी केल्याने सर्व नियोजन कोलमडले. या वाहनांच्या गर्दीमुळे चालणार्‍या वारकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागला.

श्री त्र्यंबकराज आणि संत निवृत्तिनाथांची भेट
कुशावर्त तीर्थावर नाथांच्या पादुकांची महापूजा नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार-सोनवणे व माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. येथील आरतीनंतर पालखी रथ त्र्यंबकेश्वर मंदिराकडे आला. तिथे मंदिर विश्वस्तांनी स्वागत केले. यावेळी संत निवृत्तिनाथ महाराज आणि भगवान त्र्यंबकराज यांची पारंपरिक भेट झाली. वारकर्‍यांनी अभंग सेवा सादर करत फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. पालखीचा पहिला मुक्काम दोन किलोमीटरवरील पेगलवाडी फाटा येथील महानिर्वाणी आखाड्यातील गहिनीनाथ महाराज समाधिस्थळावर आहे. तेथे भाविकांच्या भोजन व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Departure of Sant Nivruttinath’s Palkhi for Pandharpur

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago