मनपा प्रशासन महासभेत श्वेतपत्रिका ठेवण्याची शक्यता
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या मागील चार वर्षे प्रशासकीय राजवटीतील लेखाजोखा प्रशासनाने सादर करण्याची मागणी भाजपसह शिंदेसेना, ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी केली असता, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी प्रशासनाला चार वषार्ंच्या कारभाराची श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व विभागांना पत्र पाठवत प्रशासकीय राजवटीत केलेली कामे, त्यावर झालेला खर्च, शिल्लक रक्कम आदींसह सर्व माहिती सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार सर्व विभागांनी माहिती संकलित करून ती लेखा विभागाकडे सादर केली आहे. आज, मंगळवारी (दि.30) होणार्या महासभेत सभागृहात श्वेत्रपत्रिका सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दोन महासभा तहकूब कराव्या लागल्याने सभागृहात श्वेतपत्रिका सादर करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मात्र, आता आचारसहिता संपुष्टात आल्याने प्रशासन आज श्वेतपत्रिका सादर करणार असल्याचे समजते. महापालिकेत चार वर्षे प्रशासकीय राजवटीत प्रशासनाने कोणती कामे केली, यासंदर्भात सर्वपक्षीय नगरसेवकांनी श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली होती. सदस्यांची मागणी पाहता महापौर आडके यांनी 18 मार्च रोजी झालेल्या महासभेत प्रशासनाला गेल्या चार वर्षांतील कामांची श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश दिलेे. महापौरांच्या निर्देशानंतर आयुक्तांनी सर्व विभागांना पत्र पाठवत प्रशासकीय कार्यकाळातील माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विभागांनी गेल्या चार वषार्ंतील माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले होतेे. दरम्यान, महापालिकेत 13 मार्च 2022 पासून जानेवारी 2026 पर्यंत नाशिक महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकीय पातळीवर सरसकट विकासकामांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप सदस्यांचा आहे. प्रशासकीय राजवटीत किती विकासकामे झाली, किती निधी मिळाला, खर्च किती, महसूल किती, महापालिकेवर कर्ज किती झाले, आता निधी किती हवा आहे, महापालिकेची आर्थिक परिस्थिती कशी आहे, याची माहिती मिळण्यासाठी आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली होती. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, उद्याने, स्वच्छता, तसेच शहरातील पायाभूत कामांवर बेसुमार खर्च करण्यात आला. आवश्यकता नसताना कामे केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. मात्र, आज, मंगळवारी होत असलेल्या महासभेत श्वेतपत्रिका सादर झाल्यास चार वषार्ंच्या कामकाजाची कुंडली महासभेत ठेवली जाणार आहे.
प्रशासकीय राजवट असताना चार वर्षांच्या कार्यकाळातील सर्व विभागांची माहिती प्राप्त झाली आहे. आयुक्तांनी सूचना दिल्यास ती माहिती महासभेत सादर केली जाईल.
– दत्तात्रय पाथरुट, मुख्य लेखा वित्त अधिकारी, मनपा
Will the administrative regime be assessed today?
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…