नाशिक

सिन्नरमध्ये विकासकामांना गती, 82 लाखांच्या कामांना मंजुरी

सिन्नर : प्रतिनिधी
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 अंतर्गत सिन्नर शहरातील विविध विकासकामांना नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. सुमारे 82 लाख रुपये किमतीच्या या कामांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, शहरातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आणि शिफारशीमुळे ही कामे मंजूर झाली आहेत. स्थानिक नगरसेवक आणि रहिवाशांनी या कामांसाठी आमदार कोकाटे यांच्याकडे मागणी केली होती.
मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये आदर्श शाळेजवळ बंदिस्त पाईप गटार बांधकामासाठी 11.73 लाख रुपये, एकता नगर परिसरात पाईप गटार बांधकामासाठी 20.21 लाख रुपये, भिडेश्वर मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 8.47 लाख रुपये, सचिन खर्जे ते सिद्धी संकुल (जाधव कॉलनी) पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व पाईप गटारासाठी 24.47 लाख रुपये, तसेच नायगाव रोड ते पांडू डावखर यांच्या घराजवळील रस्त्यापासून सरस्वती नदीपर्यंत रस्ता बांधकामासाठी 17.23 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या विकासकामांमुळे परिसरातील रस्ते व गटार व्यवस्था सुधारून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, तसेच प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक व सभापती ललिता हांडे आणि अजय गोजरे यांनी सांगितले.

सिन्नर न.प.ला दोन अत्याधुनिक अग्निशमन वाहने

सिन्नर : प्रतिनिधी
महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत सिन्नर नगरपरिषदेस दोन अत्याधुनिक अग्निशमन वाहने खरेदी करण्यासाठी 2 कोटी 52 लाख 20 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला असून, त्यामुळे शहरातील अग्निशमन सेवा अधिक सक्षम होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी दिली.
राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये अग्निशमन सेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान राबविले आहे. या अंतर्गत जिल्हा नियोजन समिती, नाशिक यांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांच्या बळकटीकरणासाठी निधीची तरतूद केली आहे. सिन्नर नगरपरिषदेकडून दोन अत्याधुनिक अग्निशमन वाहनांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रत्येकी 5000 लिटर क्षमतेची दोन अग्निशमन वाहने खरेदी करण्यात येणार असून, प्रत्येकी वाहनाची किंमत 1 कोटी 26 लाख 10 हजार रुपये आहे. दोन्ही वाहनांसाठी एकूण 2 कोटी 52 लाख 20 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी सिन्नर नगरपरिषदेची दोन्ही अग्निशमन वाहने खराब झाली होती. त्यापैकी एक वाहन पूर्णपणे निकामी झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यात आली नव्हती, तर दुसरे वाहन दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ एका वाहनावरच संपूर्ण शहराचा भार होता. आता दोन अत्याधुनिक अग्निशमन वाहने नगरपालिकेच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने सिन्नर नगरपरिषदेचा अग्निशमन विभाग अधिक सक्षम होणार असून, आगीच्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळविणे शक्य
होणार आहे.

Development works accelerate in Sinnar, approval for works worth 82 lakhs

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

17 minutes ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

32 minutes ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

39 minutes ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

44 minutes ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

50 minutes ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

56 minutes ago