संपादकीय

काकासाहेब वाघ कारखान्याला ‘नवसंजीवनी’

गांवकरी विशेष

रानवड कारखान्याच्या आगामी वाटचालीसाठी विस्ताराची मोठी योजना असल्याची माहिती सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैया कोल्हे यांनी ‘गांवकरी’शी बोलताना दिली. आगामी गळीत हंगामात कारखान्याच्या गाळप क्षमतेचा विस्तार करण्यात येणार असून, इथेनॉलनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामात 85 हजार गाळप करून ऊस उत्पादकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने पुढील 20 वर्षांसाठी रासाका भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. हा करार उशिराने होऊनदेखील कारखान्याने सन 2025-26 हंगामात चांगले गाळप केल्याने परिसरात उत्साह आहे. या विस्तारीकरणामुळे रानवड आणि परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कारखाना पुन्हा एकदा ‘नफ्यात’ येण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

– विक्रांत पाटील

गाळप क्षमता वाढवून इथेनॉलनिर्मिती करणार!
दैनिक गाळप क्षमता 3,000 टनांपर्यंत नेणार; डिस्टिलरी कार्यान्वित करून लवकरच इथेनॉलनिर्मिती सुरू!
– विवेकभैया कोल्हे

विस्तार आणि आधुनिकीकरणाचे महत्त्वाचे टप्पे :
गाळप क्षमतेत वाढ : कारखान्याची दैनिक गाळप क्षमता वाढवून ती 3000 टन करण्यात येणार आहे.
इथेनॉलनिर्मिती प्रकल्प : केवळ साखरेवर अवलंबून न राहता, कारखान्यात लवकरच इथेनॉलनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला जाईल.
हंगामाचे यश : 2025-26 च्या गळीत हंगामात उशिराने करार झाला असूनही कारखान्याने 85 हजार टन गाळप यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

विस्तार का आवश्यक आहे?
साखर उद्योगातील बदलत्या स्वरूपामुळे विस्ताराचा निर्णय घेणे अपरिहार्य असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. श्री. कोल्हे म्हणाले की, गेल्या दशकात साखर कारखानदारीचे स्वरूप पूर्णत: बदलले आहे. पारंपरिक साखरनिर्मिती करून 1,250 टन गाळप क्षमतेचा कारखाना नफ्यात चालविणे शक्य नाही. राज्यातील साखर कारखान्यांची सरासरी दैनिक गाळप क्षमता 4,500 इतकी असून, हंगामाचे दिवस 100 दिवसांपर्यंत कमी झाले आहेत. त्यामुळे कमी क्षमतेचे साखर कारखाने चालविणे व्यवहार्य नसून, कारखान्याच्या गाळप क्षमतेत विस्तार करणे आणि उपपदार्थ निर्मिती करणे, ही काळाची गरज आहे.

शेतकर्‍यांसाठी नवीन धोरण आणि आवाहन

संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा विस्तार! तसेच शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत.
लागवडीसाठी प्रोत्साहन : वाहतूक खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बियाणे आणि खते : लवकरच कारखाना प्रशासनाकडून शेतकर्‍यांना दर्जेदार ऊस बियाणे आणि खते पुरवण्याबाबतचे धोरण जाहीर केले जाईल.
संपर्क : ऊसवाढीसाठी, बियाणे आणि खते किंवा इतर तांत्रिक मदतीसाठी शेतकर्‍यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक किरण शेलार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Kakasaheb Wagh Factory gets a ‘rejuvenation’

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

2 minutes ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

17 minutes ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

25 minutes ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

30 minutes ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

35 minutes ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

41 minutes ago