वणी : प्रतिनिधी
शाकंबरी पौर्णिमा, नाताळच्या सुट्ट्या तसेच नूतन वर्ष आरंभ या कालावधीत आलेल्या सुट्ट्या यामुळे पर्यटनस्थळांवरील गर्दीत मोठी वाढ झालेली आहे. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता तेथील प्रशासनाने मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला असून, 4 जानेवारीपर्यंत भाविकांना सप्तशृंगीदेवीचे मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले असणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. पुढील चार दिवस भाविकांची गडावर मोठी गर्दी असणार आहे. त्यात रविवारपासून आदिमायेचा सुरू असलेला शाकंबरी नवरात्रोत्सव, दि. 1 ते 3 जानेवारीपर्यंत शाकंबरी नवरात्रोत्सवानिमित्त ट्रस्टच्या वतीने आयोजित राधा-कृष्ण महायाग, शनिवार(दि. 3)ची शाकंबरी पौर्णिमा उत्सव व रविवार, दि. 4 रोजी धनुर्मासातील तिसरा रविवारचा किरणोत्सव यामुळे संपूर्ण दिवस धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असणार असल्याने या कालावधीत गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे. पर्यायी होणार्या संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने गर्दीचे व्यवस्थापन व भाविक भक्तांना समाधानकारक दर्शन होणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने येणार्या भाविकांची गर्दी विभागली जावी आणि सर्वांना सहजतेने श्री भगवती दर्शन घेता यावे यासाठी नूतन वर्ष प्रारंभास विविध राज्यांतून येणार्या भाविकभक्तांंसाठी श्री भगवती मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार
आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…