नाशिक: पहिल्या यादीत नाव न आल्यामुळे नाशिक मध्य मतदार संघातील विध्यमान आमदार देवयानी फरांदे यांचा जीव टांगणीला लागला होता. त्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर माजी नगरसेवक घेऊन जात मोठे शक्तिप्रदर्शन देखील केले होते . मात्र अखेर आज जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत देवयानी फरांदे यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता नाशिक मध्य मतदार संघात ठाकरे गटाचे वसंत गीते विरुद्ध देवयानी फरांदे आणि उमेदवारी मिळावी म्हणून अडून बसलेल्या काँग्रेसच्या हेमलता पाटील असा तिरंगी सामना रंगणार आहे.
नाशिक पूर्व मधून गीते
नाशिक पूर्व मधून माजी स्थायी सभापती गणेश गीते यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे तर येवल्यातून छगन भुजबळ यांच्याविरोधात माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजून चांदवड चा तिढा कायम आहे. तर इगतपुरी मतदार संघात देखील निर्मला गावित यांना अजून प्रतीक्षा आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…