नाशिक

माजी मंत्री धनंजय मुंडे यांची नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी

मौनव्रत असल्याने माध्यमांना प्रतिक्रिया नाही

पंचवटी : वार्ताहर
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे धार्मिक कार्यक्रमासाठी बुधवारी (दि.4) नाशिकमध्ये होते. सकाळी गोदाघाटावर एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर संध्याकाळी त्यांनी विवाह सोहळ्यासदेखील हजेरी लावली. परंतु, मुंडे यांनी मौनव्रत असल्याचे खुणवत कोणत्याही विषयावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. इगतपुरीच्या विपश्यना केंद्रातदेखील शेवटच्या दिवशी संवाद कार्यक्रमात सहभाग न घेता त्यांनी मुंबईकडे प्रस्थान केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेला आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या सहकार्‍यांना बीड पोलिसांनी अटक केली. त्यानंतर विरोधकांनी आणलेल्या दबावामुळे मुंडे यांनादेखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर मुंडे हे माध्यमांपासून जरा अंतर राखून असल्याचेच दिसून आले आहे. दरम्यान, दिनांक 3 जून रोजी गोपीनाथ गडावर मुंडे भाऊ-बहीण कार्यक्रमात दिसून आले. तब्बल 11 वर्षांनी ते एकत्र आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांशी भावनिक संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडेदेखील काही बोलतील, अशी अपेक्षा उपस्थितांना होती. परंतु, यावेळी देखील त्यांनी बोलणे टाळले. दोन दिवसांपूर्वीच इगतपुरीतील विपश्यना केंद्रात मुंडे यांनी दहा दिवस ध्यानधारणा केली. परंतु समारोपालादेखील संवाद न साधता मुंबईची वाट धरली होती.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago