नाशिक

चांदोरी बसस्थानकाची दुरवस्था; प्रवासी त्रस्त

खड्डे, चिखल, मूलभूत सुविधांअभावी नागरिकांमध्ये संताप

निफाड : विशेष प्रतिनिधी
चांदोरी येथील बसस्थानकाची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात प्रवाशांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
वारंवार तक्रारी करूनही एसटी प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चांदोरी हे परिसरातील महत्त्वाचे केंद्र असल्याने येथून दररोज शेकडो प्रवासी व विद्यार्थी ये-जा करतात. मात्र, बसस्थानकाचे रस्ते पूर्णपणे उखडल्याने बस येताना-जाताना चिखलमिश्रित पाणी आणि खडी प्रवाशांच्या अंगावर उडते. बसमध्ये चढताना-उतरताना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताची भीती वाढली आहे.
बसस्थानकात मूलभूत सुविधांचाही प्रचंड अभाव आहे. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय नाही, तसेच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आलेले नाहीत. सर्वांत मोठी अडचण स्वच्छतागृहाची असून, सुविधा नसल्याने महिला, वृद्ध व दिव्यांग प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच काही नागरिकांकडून उघड्यावर शौच केली जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. साचलेले पाणी आणि कचर्‍यामुळे डासांची उत्पत्ती वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन खड्डे बुजवावेत, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चांदोरी येथील बसस्थानकात विविध समस्यांमुळे प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. पुढील वर्षी येणार्‍या कुंभमेळ्याच्या दृष्टीने हे बसस्थानक महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सध्याची प्रचंड अस्वच्छता, खड्डे आणि दुर्गंधी पाहून प्रवासी हतबल झाले आहेत. एसटी महामंडळ प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येची तातडीने दखल घेणे
गरजेचे आहे.
– संतोष टर्ले, निवृत्त न्यायाधीश, चांदोरी

 

Dilapidated state of Chandori bus stand; passengers inconvenienced.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago