8 जुलैला कामगारमंत्र्यांसोबत निर्णायक बैठक
नाशिक : प्रतिनिधी
चार श्रमसंहिता महाराष्ट्रात लागू करू नयेत, किमान वेतन 30 हजार रुपये करावे, कंत्राटी व निश्चित कालीन कर्मचार्यांना कायम करावे तसेच असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे आदी मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्रच्या वतीने शुक्रवारी आझाद मैदानावर महाधरणे आंदोलन करण्यात आले. मुसळधार पावसातही सुमारे पाच हजार कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला.
आंदोलनानंतर कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेत 8 जुलै रोजी चार श्रमसंहिता, त्यांचे नियम आणि इतर प्रलंबित मागण्यांवर विस्तारित बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर संयुक्त कृती समितीने महाधरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
संयुक्त कृती समितीने मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात चार श्रमसंहिता लागू करण्यापूर्वी कामगार संघटनांशी चर्चा करावी, किमान वेतन 30 हजार रुपये करावे, कंत्राटी, हंगामी व निश्चित कालीन कर्मचार्यांना कायम करावे, योजना कर्मचार्यांना सरकारी कर्मचार्यांचा दर्जा देऊन ईएसआय, भविष्यनिर्वाह निधी, रजा व बोनसचे लाभ लागू करावेत, तसेच असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून सामाजिक सुरक्षा योजना राबवाव्यात, अशा प्रमुख मागण्या केल्या. केंद्र सरकारने चार श्रमसंहिता लागू केल्या असून, राज्य सरकारनेही त्यासंदर्भातील नियम प्रस्तावित केले आहेत.
या संहितांमुळे कामगारांच्या संघटना स्थापन करण्याचा, संप करण्याचा आणि कायम नोकरीचा अधिकार बाधित होईल तसेच कंत्राटीकरणाला चालना मिळेल, असा आरोप संयुक्त कृती समितीने केला. वाढती महागाई, बेरोजगारी आणि असंघटित कामगारांची होत असलेली उपेक्षा लक्षात घेता कामगारहिताचे धोरण तयार करण्यापूर्वी संघटनांशी सविस्तर चर्चा करण्याची मागणीही करण्यात आली. शिष्टमंडळात डॉ. डी. एल. कराड, निवृत्ती धुमाळ, कैलास कदम, गोविंदराव मोहिते, मुकेश तिघोटे, संतोष चाळके, सुकुमार दामले यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. आंदोलनाला विवेक मॉन्टेरो, रवी जोशी, मिलिंद रानडे, मंगला ठोंबरे, महेश करकेरा, उदय भट, त्रिशेला कांबळे, स्नेहा सावंत, विजय जाधव आदींनी मार्गदर्शन केले.
Workers’ protest against four labor codes
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…