दिंडोरी: प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गड येथील शीत कड्यावरून उडी घेऊन दिव्यांग तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली.
हरिसिंग रायसिंग पवार (वय ३४, रा. ब्राम्हणवेल ता. साक्री, जि. धुळे) असे मृत तरुणाचे नाव आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गडावरील शितकड्यावरून उडी घेतल्याची माहिती मिळाली. यानंतर वणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भातोडा गावातील तरुणांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविण्यात आला.
त्यानंतर दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या दरम्यान मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. येथे शवविच्छेदन करण्यात आले.
या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…