सिन्नर : प्रतिनिधी
एप्रिल महिन्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने सिन्नर तालुक्यातील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या वाढत्या उष्णतेचा फटका केवळ माणसांनाच नव्हे, तर पशुपक्षी आणि शेती पिकांनाही बसत आहे. विशेषतः फळबागांवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत असून,
फुलगळ, फळगळ आणि उत्पादन घटण्याची भीती शेतकर्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत घोटेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी सुनील साईनाथ घोटेकर (40) यांनी आपल्या डाळिंबबागेसाठी केलेला अभिनव प्रयोग सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
घोटेकर यांनी आपल्या सुमारे सहा एकर क्षेत्रातील डाळिंबबागेवर पांढर्या कापडी आच्छादनाचा वापर केला आहे. या आच्छादनामुळे संपूर्ण बाग जणू पांढर्या शालूने नटल्याचे आकर्षक दृश्य निर्माण झाले आहे. मात्र, या प्रयोगामागे केवळ सौंदर्य नसून, शास्त्रीय दृष्टिकोनातून उष्णतेचा परिणाम कमी करण्याचा हेतू आहे.
पांढर्या कापडामुळे सूर्यप्रकाशाची थेट तीव्रता कमी होते आणि बागेतील तापमान काही अंशी नियंत्रित राहते. परिणामी, झाडांवरील उष्णतेचा ताण कमी होतो. यामुळे फुलांची गळती कमी होऊन फळधारणा टिकून राहण्यास मदत होते. विशेषतः डाळिंबासारख्या नाजूक पिकांसाठी हा उपाय उपयुक्त ठरत असल्याचे घोटेकर यांनी सांगितले.
The pomegranate orchard has woven a ‘white shawl’
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…