format: 2; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 12582912;cct_value: 0;AI_Scene: (2, 0);aec_lux: 183.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 32;
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात गेल्या 24 तासांत 9.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील विविध धरणांमधून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू आहे. सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
सायंकाळी 6 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून 3,387 क्यूसेक, कडवा धरणातून 3,832 क्यूसेक, पालखेड धरणातून 7,960 क्यूसेक, दारणा धरणातून 9,284 क्यूसेक, ओझरखेड धरणातून 2,637 क्यूसेक, भावली धरणातून 1,218 क्यूसेक, वाघाड धरणातून 1,783 क्यूसेक, करंजवण धरणातून 4,100 क्यूसेक, पुणेगाव धरणातून 2,384 क्यूसेक, भाम धरणातून 3,076 क्यूसेक तसेच इतर धरणांतूनही नियंत्रित विसर्ग सुरू आहे.
गोदावरी नदीवरील होळकर पुलाजवळील प्रवाह 5,155 क्यूसेक इतका विसर्ग नोंदविण्यात आला आहे. तर नांदूरमध्यमेश्वर बंधार्यातून 22,770 क्यूसेक पाण्याचा विसर्ग
सुरू आहे.
जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नदीपात्रालगत राहणार्या नागरिकांनी तसेच शेतकर्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सूचित केले. आहे.
Discharge from dams continues.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik