654 गावे-वाड्यांची तहान टँकरवर
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकूण 654 ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या माध्यमातून तीन लाख 18 हजार 708 नागरिकांची तहान भागवली जात आहे.
जिल्ह्यात सध्या एकही शासकीय टँकर कार्यरत नसून सर्व 179 टँकर खासगी आहेत. या टँकरच्या माध्यमातून दररोज 395 फेर्या मारून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची झळ विशेषतः ग्रामीण व डोंगराळ भागांना बसत आहे. विहिरी, कूपनलिका आणि लहान जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.
जिल्ह्यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती नांदगाव तालुक्यात असून, येथे 38 गावे व 192 वाड्या अशा एकूण 230 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या भागातील 53 हजार 216 नागरिकांना टँकरद्वारे पाणी दिले जातेे. येवला तालुक्यात 114 गावे-वाड्या, सिन्नरला 79, मालेगाव 65 आणि इगतपुरीत 50 ठिकाणी टँकर सुरू आहेत. या तालुक्यांत पाणीटंचाईची तीव्रता अधिक असल्याचे चित्र आहे.
इगतपुरी तालुक्यातील 24 हजारांहून अधिक नागरिक, मालेगावमधील 39 हजारांहून अधिक नागरिक, तर येवला तालुक्यातील 82 हजार 252 नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सिन्नर तालुक्यातही 37 हजार 471 नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
दरम्यान, दिंडोरी व कळवण तालुक्यात काही ठिकाणी टंचाई असली, तरी स्थानिक जलस्रोतांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसते. नाशिक शहर आणि निफाड तालुक्यात सध्या टँकरची गरज भासलेली नाही.
प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी टँकरच्या फेर्यांवर सतत लक्ष ठेवले जात आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. हवामान खात्याने मान्सून लवकरच सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला असला, तरी तोपर्यंत जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.
सर्वाधिक टंचाई असलेले तालुके
तालुका गावे-वाड्या
नांदगाव 230
येवला 114
सिन्नर 79
मालेगाव 65
इगतपुरी 500
पाणीटंचाईची स्थिती
टँकरने पाणीपुरवठा होणारी गावे 174
टँकरने पाणीपुरवठा होणार्या वाड्या 480
एकूण गावे-वाड्या 654
खासगी टँकर 179
शासकीय टँकर 00
दररोजच्या टँकर फेर्या 395
लाभार्थी लोकसंख्या 3,18,708
District awaiting monsoon
लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…
कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…
सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…
अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…
महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…