प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा 2026-27 चा उद्घाटन सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नाशिकरोड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी सांगितले की, खेळामुळे विद्यार्थ्यांच्या फक्त गुणांना मुक्तांगण मिळते. तसेच आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
या स्पर्धेत अंडर-17 मुलांच्या गटात तब्बल 325 खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, विविध शाळांमधून आलेल्या बुद्धिबळपटूंमध्ये स्पर्धेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, उपप्राचार्य राधा पाटील, लक्ष्मण शेंडगे, क्रीडाशिक्षक योगेश शिंदे, क्रीडाशिक्षक मंगेश गंभीरे आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रीती करवा उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
बुद्धिबळ हा विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि तर्कशक्ती विकसित करणारा खेळ आहे. अशा जिल्हास्तरीय स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवण्याची तसेच पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी
स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळते. स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात बुद्धिबळाचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, विविध शाळांमधील खेळाडूंच्या चुरशीच्या लढतींकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष
लागले आहे.
District-level school chess tournament begins with the participation of 325 players.