हक्काचं शहर अभियानाचा शुभारंभ

स्मार्ट सिटीमुळे शहरांचा विकास नाही, तर भकास : पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : प्रतिनिधी
भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच नरेंद्र दाभोलकर आणि मुरलीधर माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहर काँग्रेस कमिटीतर्फे हक्काचं शहर अभियानाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राजीव गांधी, नरेंद्र दाभोलकर आणि मुरलीधर माने यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्मार्ट सिटीच्या नावाने शहरांचा विकास झाला नसून, शहर भकास झाले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. केवळ टक्केवारी मिळविण्यासाठी मोठमोठी टेंडर काढली जात असून, कामाचा दर्जा, गुणवत्ता आणि नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप
त्यांनी केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर यांनी नाशिक शहरातील खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे अनेक नागरिकांचे जीव गेले असून, त्यांच्या कुटुंबीयांना तुटपुंजी मदत जाहीर करून प्रशासन त्यांची चेष्टा करीत असल्याची टीका केली.
शहर काँग्रेस अध्यक्ष नीलेश (बबलू) खैरे यांनी सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनावर टीका केली.
यावेळी नाशिक जिल्हा काँग्रेस उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, डॉ. दिनेश बच्छाव, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, रईस शेख, लक्ष्मण धोत्रे, विजय राऊत, उद्धव पवार, किरण जाधव, संतोष ठाकूर, जयेश पोकळे, समाधान बागूल आदी पदाधिकारी
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुसूचित विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केले. युवक काँग्रेस नेते स्वप्नील पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास वृंदा शेरे, कुसुम चव्हाण, अनिता खरारे, पोपटराव धात्रक, बाबा खतीब, अरुण दोंदे, जाकीर अत्तार, धोंडीराम बोडके, अभिजित राऊत, भारत पाटील, विजय पाटील, अशोक शेडगे, भालचंद्र पाटील, अ‍ॅड. सागर वाहुळे, सुदेश मोरे, शंकर जाधव, मंगेश लहांमगे, मोहन शिंदे, संतोष कस्तुरे, राजेंद्र महाले, हर्षल पवार, संदीप वाघ, दीपक राव, कैलास कडलग, इसाक कुरेशी, प्रा. प्रकाश खुळे, कैलास महाले, फारुख कुरेशी, जावेद पठाण, प्रकाश माळी, संजय पाटील, सईद मनियार, अ‍ॅड. सुमित चोपडे, शैलेश मैंद, पोपटराव नागपुरे, मुकेश द्विवेदी, इरफान बागवान, आसिफ पठाण, किसन दुशिंग, आकाश घोलप, भूषण अहिरे, शुभम पाटील, संजय पितळे, सुनील राजपूत, गोरख साळवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Launch of the ‘Hakkacha Shahar’ (City of Rights) Campaign

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *