बोलतो का आम्ही मराठी..?

लाभले आम्हांस भाग्य बोलतो आम्ही मराठी…
खरंच सांगा ना, बोलतो का आम्ही मराठी…?
ती फुलदाणी- तो फ्लॉवर पॉट झाला. प्रकाशाचा दिवा- तो लाईट, लॅम्प झाला.
शिक्का तोही स्टॅम्प झाला. वस्तूंमध्ये कुठून स्टूल आणी टेबलं आल. बोलणे बघा किती सुटेबल झालं…. लेखणी झाली पेन अन् पेन्सिल. खोडरबर झाले इरेझर. वही-पुस्तकं झाले नोटबुक अन् टेक्स्टबुक.
उजळणीतील पाढे तेही झाले टेबल. बोलणे बघा किती झाले सुटेबल….
कुठून शब्द आले सलून आणि पार्लर. औषधाच्या दुकानालाही म्हणू लागले मेडिकल. दवाखाना ऐकू यायचे थोडेफार म्हणतात त्यालाही हॉस्पिटल.
बोलणे बघा किती झाले सुटेबल….
मराठी भाषा जणू पाणी निखळ, निर्मळ. सामावून घेते इतर भाषेतील शब्द अवखळ. मराठी मातृभाषा आता समजण्या बोलण्यापुरती राहिली.
हळूहळू तिची जागा इंग्रजी माध्यमाने घेतली. प्रार्थनेचे स्वरूप झाले प्रेयर.
स्तोत्र किंवा मंत्र नसतात त्यात कन्सिडर. ओळख जवळीक साधत करत होतो नमस्कार अन् रामराम. हाय हॅलो म्हणत झालो आता किती लांब लांब.
घर आणि शाळा कुठेतरी होतो डायवर्ट. कळत नकळत होतो का आम्ही कन्वहर्ट.
लोककला, पोवाडे, सवाल-जवाब, लावणी संस्कृती
हळूहळू लुप्त होत चालली.
एकेकाळी दिली जात होती यांना उत्तम मनोरंजनाची पावती.
संतांनी साकारले अभंग अन् ओवी.
भक्त, भक्ती अन् भगवंत या नातेसंबंधातली नात्यातील गोडी.
शिवरायांचा इतिहासाची साकारली पाने
लग्नसमारंभ, जात्यावरची असो की असो बहिणाबाईची ती सुमधुर गाणे…
नेहमीच परिचय मराठी भाषेचा देतील.
जपली जर नेहमी तर अखंड अजरामर राहतील
पण हे खरंच आहे मराठी भाषेने सर्वांनाच समृद्ध आणी समाधानी बनवले.मराठी मातीने मराठी भाषेने मराठी माणसे घडविले.

Do we speak Marathi..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *