नवी दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढता खर्च आणि पश्चिम आशियातील तणावाचे कारण देत तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. 14.2 किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमागे 29 रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. या नव्या दरवाढीमुळे मुंबई आणि दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती आता 912 ते 951 रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. दरवाढीपूर्वी नाशिकमध्ये घरगुती सिलिंडरचा दर 916.50 रुपये होता. 29 रुपयांच्या वाढीनंतर आता हा नवा दर 945.50 रुपये झाला आहे. शहरी व ग्रामीण भागात स्थानिक वितरकांच्या सेवा शुल्कानुसार प्रत्यक्ष बिलामध्ये काही रुपयांचा किरकोळ फरक असू शकतो. गेल्या काही महिन्यांत व्यावसायिक गॅसच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आता थेट घरगुती गॅस महागल्याने महागाईच्या आगीत आधीच होरपळणार्या सर्वसामान्य जनतेचे आणि विशेषतः गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
जनता त्रस्त; सरकार इव्हेंटबाजीत व्यस्त : रोहित पवार
आ. रोहित पवार यांनीही या महागाईवरून सरकारला अत्यंत आक्रमकपणे घेरले आहे. पेट्रोल-डिझेलपासून ते थेट ताटातील अन्नापर्यंत आणि आता स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत सतत होणारी दरवाढ ही सरकारची सर्वसामान्यांप्रति असलेली पूर्ण असंवेदनशीलता दर्शवते, असे त्यांनी ठणकावून सांगितले. या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने राज्यभरात ’चूल पेटवा’ यांसारखी आंदोलने तीव्र केली असून, सर्वसामान्यांचे खिसे कापणारे सरकार जागे न झाल्यास याविरोधात रस्त्यावर उतरू.
टप्प्याटप्प्याने जनतेला महागाईचे धक्के : शरद पवार
या अन्यायकारक दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे. पंतप्रधानांनी सुरुवातीला सांगितले होते की, आम्ही महागाई नियंत्रणात ठेवू, पण ’नियंत्रित’ याचा अर्थ टप्प्याटप्प्याने जनतेला महागाईचे धक्के द्यायचे हेच त्यांचे सूत्र आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली. महागाईच्या या भडक्याची राजकीय किंमत सत्ताधार्यांना योग्य वेळी नक्कीच मोजावी लागेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
Domestic gas cylinder prices increase again
मालेगावला डॉ. डांगेंसह चार डॉक्टरांना अटक मालेगाव : प्रतिनिधी शहरातील सटाणा नाका परिसरातील एका खासगी…
तंत्रज्ञान, डिझाइनचा अनोखा संगम; 11 जून रोजी उद्घाटन सोहळ्यात होणार वापर मेक्सिको सिटी : फिफा…
नवजात बालक गोणीत भरून नेण्यास सांगितल्याचा आरोप मालेगाव : प्रतिनिधी शहरातील मच्छी बाजार परिसरातील सिद्दिकी…
15 जूनपर्यंत पेरण्या न करण्याचे शेतकर्यांना आवाहन मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. तळकोकणाच्या…
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…