राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा रंगली असतानाच आज या जागेवर भुजबळ यांच्या ऐवजी राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे भुजबळ यांचे राज्यसभेत जाण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर महायुतीतून कुणाला उमेदवारी द्यायची, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्या नावांवर राष्ट्रवादीत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा झाली. परंतु अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीने विदर्भातील नेते राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

राज्यसभेसाठी विदर्भाला प्रतिनिधित्व देण्याचे पक्षाच्या मनात होते. त्यानुसार सर्वंकष चर्चेनंतर आम्ही राजेंद्र जैन यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जैन यांचे नाव अंतिम झाल्याचे तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने सखोल चर्चा केली. राष्ट्रवादी पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे उमेदवार म्हणून राजेंद्र जैन यांना पक्षाने अधिकृतपणे उमेदवारी दिली. विधानसभेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज संस्थेतून त्यांनी १२ वर्षे प्रतिनिधित्व केले. मध्यवर्ती बँक, फेडरेशन या संस्थेमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. विदर्भाला संधी देण्याचे पक्षाच्या मनात होते. त्यादृष्टीने पक्षाने एकमताने निर्णय  घेतलेला आहे.

प्रफुल पटेल यांची सरशी

राजेंद्र जैन मूळचे विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील आहेत

त्यांनी यापूर्वी विधान परिषदेचे आमदार म्हणूनही काम पाहिले आहे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून राजेंद्र जैन यांच्याकडे पाहिले जाते प्रफुल पटेल यांनी राजेंद्र जैन यांच्या तिकीटासाठी जोर लावल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जाते.

 

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago

सौर कृषिपंपांमध्ये महाराष्ट्राची विक्रमी झेप

देशात सर्वाधिक 10 लाखांचा टप्पा गाठला नाशिक : प्रतिनिधी सौर कृषिपंपांमध्ये विश्वविक्रम करणार्‍या महाराष्ट्राने सर्वाधिक…

2 days ago